मंत्रिमंडळ बैठक 22/04/2026

Cabinet Meeting – April 22, 2026

 

 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णयांचा धडाका लावण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरण रक्षण, उच्च शिक्षण, रोजगार निर्मिती आणि महसूल विभाग अशा चार महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मंजुरीची मोहोर उमटवली आहे.

अमेरिकेतील ४०% भारतीय देश सोडण्याच्या तयारीत

१. महाराष्ट्र बायोगॅस धोरण २०२६ जाहीर:
राज्यातील वाढता कचरा आणि ऊर्जेची गरज लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस  धोरण २०२६’ ला मान्यता देण्यात आली आहे.

महसूल अधिकाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर

या वर्षासाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती नेमली जाईल. हे प्रकल्प पीपीपी (PPP) आणि हायब्रीड अन्युईटी तत्त्वावर राबवले जाणार असून, यामुळे हरित गृह वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.

 

२. साताऱ्यात नवा ‘आयटी हब’:
सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. यासाठी एमआयडीसीला ४२.५५ हेक्टर जमीन देण्यास मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कसे राहणार? हवमान विभागाचा चिंता वाढविणारा अंदाज

३. शिक्षकांसाठी मोठी घोषणा:
राज्यातील ७ आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ) निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार आहे. तसेच, या शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आगामी पद भरतीमध्ये अतिरिक्त गुणांचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी नोकरीचा मार्ग सुकर होईल.

 

४. जमिनीच्या नियमात बदल:

कमाल जमीन धारणा मर्यादेनुसार भोगवटादार वर्ग-२ मधील जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. या संदर्भातील नवीन अधिसूचना काढण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे.

राहुल गांधींवरील कारवाईचा हायकोर्टाने स्वतःचाच आदेश बदलला

 

Related Articles