अमेरिकेतील ४०% भारतीय देश सोडण्याच्या तयारीत

40% of Indians in the US are preparing to leave the country.

 

 

एकेकाळी भारतीयांसाठी स्वप्नांची दुनिया मानला जाणार अमेरिका (America) आता लोकांना नको झाल्याचे चित्र दिसत आहे. कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशन पीस (२०२६) च्या ताज्या रिपोर्टनुसार,

 

अमेरिकेत स्थायिक भारतीयांना मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. तर काही भारतीय अमेरिका सोडून सुरक्षित आणि स्थिर भविष्याच्या शोधात दुसऱ्या देशांचा विचार करत आहेत.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी

अमेरिकेतील सर्वात अल्पसंख्याक समुदाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीयांच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे.

 

कार्नेगीच्या रिपोर्टनुसार, तब्बल ४०% भारतीय-अमेरिकन आता देश सोडून दुसरीकडे स्थायकि होण्याचा विचार करत आहेत. यामागे अनेक कारणे सर्वेक्षणातून समोर आली आहेत. जाणून घेऊयात नेमकी काय कारण आहेत.

 

राजकीय अस्थिरता आणि समाजिक धुव्रीकरण : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अत्यंत कठोर धोरणे अवलंबवली आहेत.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

यामुळे राजकीय कट्टरतेत वाढ होत असून सुमारे ५८% भारतीयांनी अमेरिकेत असुरक्षितात जाणवू लागली आहेत. अमेरिकेतील समाजात सर्वसमावेशकता कमी होत होत चालली असल्याचे भारतीयांचे म्हणणे आहे.

 

ग्रीन कार्डसाठीची प्रतीक्षा : अहवालानुसार, अमेरिकेची इमिग्रेशन व्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची झाली असून ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी लोकांना ३० ते ७० वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे तरुण पिढीला त्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे जाणवत आहे.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी

वाढती महागाई : गेल्या काही काळात अमेरिकेच्या न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शहरांमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. महागडे शिक्षण आणि आरोग्य सेवांमुळे मध्यमवर्गीय भारतीयांवर आर्थिक ताण पडत आहे.

 

अहवालानुसार, अमेरिका सोडण्याची इच्छा असणारे सर्वच लोक वैतागलेले नाहीत. तर भारतात नव्या संधीच्या शोधात आहेत.
गेल्या काही काळात बेंगळुरु, हैदराबाद आणि पुणे यांसारखी शहरे जागतिक स्तरावर टेक हब बनली आहेत. यामुळे लोकांना रोजगाच्या संधी दिसून येत आहे.

 

आजपासून जमिनीच्या NA प्रक्रियेत बदल
शिवाय आपल्या मातीत, संस्कृतीत राहण्याची, पालकांजवळ राहण्याची ओढळ लोकांना लागली आहे.
तसेच काही लोकांना भारतात परतण्याची इच्छा नसून ते अमेरिकेला पर्यायी मार्ग शोधत आहेत. कॅनडा(, ऑस्ट्रेलिया  किंवा दुबई अशा देशांमध्ये स्थायिक होण्याची आणि तेथील नागरिकत्व मिळवण्याची इच्छा भारतीयांनी व्यक्त केली आहे.

 

तज्ज्ञांच्या मते हे एक व्यापक बदलाचे लक्षण आहे. एकेकीळा अमेरिकन स्वप्नाला आपले अंतिम ध्येय मानणारे लोक आता मात्र डॉलरच्या मोहापेक्षा मानसिक शांतता, सामाजिक सुरक्षा आणि स्थिर भविष्याकडे वळताना दिसत आहेत.

दीड कोटींच बिल मंजूर करण्यासाठी 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Related Articles