आजपासून जमिनीच्या NA प्रक्रियेत बदल

Changes in the land NA process from today

 

 

राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेली अकृषिक रुपांतरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली चे लोकार्पण करण्यात आले.

 

या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना अकृषिक रुपांतरण अधिमूल्य ऑनलाइन भरता येणार असून, त्याची नोंद थेट 7/12 उताऱ्यावर होणार आहे. मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे जमीन व्यवहार आणि बांधकाम प्रक्रियेत मोठा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा रुग्णालयातून ‘मास्टरस्ट्रोक

 

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणांनंतर शासनाने अकृषिक वापराबाबत निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी बीपीएमएस प्रणाली आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना विकास परवानगी आणि बांधकाम आराखडे मंजूर करतानाच एकाच ठिकाणी रूपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बिगरशेती वापरासाठी आवश्यक असणारे एकरकमी अधिमूल्य आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही.

 

अधिमूल्य भरल्यानंतर त्याची माहिती महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीशी जोडली जाईल आणि सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद आपोआप होणार आहे.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, बीपीएमएसच्या धर्तीवर ऑटो डीसीआर प्रणालीमध्येही आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत. पुढील 10 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, ज्यामुळे मोठ्या विकास प्रकल्पांच्या मंजुरीला अधिक वेग मिळणार आहे.

 

यापूर्वी नागरिकांना अकृषिक परवानगी मिळवण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होणार असून पारदर्शकता वाढणार आहे.

नदीत नाव उलटून १० जणांचा मृत्यू;पाहा VIDEO

10 फेब्रुवारीच्या शासन निर्णयातील तरतुदींना या प्रणालीमुळे गती मिळणार असून ‘Ease of Doing Business’ ला चालना देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

 

 

Related Articles