Petrol-Diesel Rate News;देशात जनतेकडून 1 लीटर पेट्रोल-डिझेलवर सरकार किती कमवते

Petrol-Diesel Rate News;How much does the government earn from the public on 1 liter of petrol and diesel in the country?

 

 

 

सध्या आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असले तरी, इंधनाचा सरासरी भाव 100 ते 105 रुपये प्रति लिटर च्या आसपास आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की 1 लिटर पेट्रोलवर सरकार किती पैसे कमावते?

हे हि वाचा :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प -आणि टेस्लाचे मालक एलाॅन मस्क यांच्यात जुंपली

तुम्हाला प्रति लिटर पेट्रोलवर किती कर (टॅक्स) भरावा लागतो हे ठाऊक आहे का? चला, यामागचं खरं गणित काय आहे ते पाहू.

आपण आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरतो, पण अनेकांना हे माहीत नसतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर मोठा कर लावतात.

 

या कर आणि इतर खर्चांची भर घालूनच हिंदुस्थान पेट्रोलियम , इंडियन ऑइल  आणि भारत पेट्रोलियम  या तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर करतात.

हे हि वाचा :ट्रम्पचा निर्णय;अमेरिकेत 9 जूनपासून या 12 देशातील लोकांना प्रवेश बंद

1 लिटर पेट्रोलवर किती टॅक्स लागतो? : दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, 1 लिटर पेट्रोलवर 15.40 रुपये व्हॅट  लागतो, जो राज्य सरकारच्या खात्यात जातो.

 

त्याच वेळी, केंद्र सरकार उत्पादन शुल्काच्या  नावाखाली 21.90 रुपये वसूल करते. याशिवाय, सरासरी 4.39 रुपये डीलर कमिशन म्हणून आकारले जातात.

हे हि वाचा :कानपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या स्वागताला गुन्हेगार ;उत्तर प्रदेशात खळबळ

पेट्रोलची सरासरी बेस प्राईस 52.84 रुपये प्रति लिटर असते. यात 0.26 रुपये आणि काही इतर किरकोळ सरासरी शुल्क जोडून 1 लिटर पेट्रोलची किंमत ठरते.

 

या गणितानुसार, 1 जून रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत 94.77 रुपये प्रति लिटर होती. लक्षात घ्या की, कोलकातासह देशातील इतर शहरांमध्ये ही किंमत थोडी बदलू शकते.

 

डिझेलचं गणित कसं आहे? : डिझेलच्या बाबतीत, डीलर्सचं सरासरी कमिशन 3.02 रुपये प्रति लिटर असतं. डिझेलची बेस प्राईस 53.76 रुपये असते.

हे हि वाचा :आता सरकारकडून ई-मेल, व्हॉट्सअँप वरून होणार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाई

याशिवाय, 0.26 रुपये काही किरकोळ शुल्क देखील आकारले जातात. या सर्व गणितानंतर, 1 लिटर डिझेलची किंमत ठरते. या गणितानुसार, 1 जून 2025 रोजी दिल्लीत 1 लिटर डिझेलची किंमत 87.67 रुपये प्रति लिटर होती.

 

सरकारला किती कमाई होते? : कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे केंद्र सरकारने अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले आहे. पेट्रोलच्या बाबतीत, उत्पादन शुल्क 2 रुपयांनी वाढवले आहे.

 

दुसरीकडे, डिझेलवरील उत्पादन शुल्कही सरकारने 2 रुपयांनी वाढवले आहे. याचा सामान्य माणसावर कोणताही परिणाम होणार नाही. सरकारने आपला महसूल वाढवण्यासाठी उत्पादन शुल्क वाढवले आहे.

हे हि वाचा :कानपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या स्वागताला गुन्हेगार ;उत्तर प्रदेशात खळबळ

या हिशेबाने पाहिले तर, केंद्र सरकारला पेट्रोलवर सरासरी 21.90 रुपये प्रति लिटर कमाई होईल. तर डिझेलवर केंद्र सरकारला 17.80 रुपये प्रति लिटर कमाई होईल.

 

मात्र, उत्पादन शुल्क वाढवण्यापूर्वी केंद्र सरकार पेट्रोलवर 19.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 15.80 रुपये प्रति लिटर कमवत होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *