NCP’s serious allegation;आमदार तोडपाणी साठी कामे अडविण्याचे काम करतात राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
NCP's serious allegation that MLAs are obstructing works for water supply


विधानसभा मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची कामे रोखल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
जिल्ह्यातील बीड मतदारसंघात सन 2019 पासून हीच परिस्थिती असून कोट्यवधी रुपयांची टक्केवारी घेऊन आमदार संदीप क्षीरसागर कामे अडवत असल्याचा थेट आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा;..शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
केवळ तोडपाणी करण्यासाठी कामे अडविण्याचे काम आमदार करत आहेत. पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.
जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील जनतेची कामे अडविण्यात आली आहेत. केवळ आमदारच नाही
हे सुद्धा वाचा;..तासिकातत्वावर प्राध्यापकांचे मानधन वेळेवर देण्यासाठी आता पोर्टल
तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील मतदार संघातील कामे रोखले असल्याचं म्हणत संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात आंदोलकांनी रोष व्यक्त करण्यात आला.
विशेष म्हणजे आंदोलनात सहभागी झालेले स्थानिक पदाधिकारी हे सत्ताधारी पक्षाचे असून महायुतीमधील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे, विरोधी पक्षातील आमदाराविरुद्ध ही स्थानिक नेतेमंडळी एकत्र येऊन संताप व्यक्त करत आहे.
हे सुद्धा वाचा;..शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
जिल्हा परिषद, पीडब्लूडी विभागाची कामे अडवली आहेत. कार्यकारी अभियंता तोंडे, उप कार्यकारी अभियंता बोराडे आणि ज्युनिअर इंजिनिअर ठाकूर हे तिन्ही अधिकारी आमदार संदीप क्षीरसागर यांनी घरगडी म्हणून घरी ठेवले आहेत.
या अधिकाऱ्यांना मंत्र्यांच फोन गेले, पालकमंत्र्यांचे फोन गेले तरीही अधिकारी काम ऐकत नाहीत, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात महायुतीमधील तिन्ही पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा;..प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू कसा झाला? रेल्वेची धक्कादायक माहिती
दरम्यान, पुढील 3 ते 4 महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे, स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकारी आक्रमकपणे भूमिका घेत आहेत.
हे सुद्धा वाचा;.. तासिकातत्वावर प्राध्यापकांचे मानधन वेळेवर देण्यासाठी आता पोर्टल
मतदारसंघात व वार्डांमध्ये सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकांपूर्वी गावातील विकासाची कामे मार्गी लावून मतदारांना सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.