Missile Attack On Israel : इस्रायलवर पुन्हा एकदा मोठा मिसाइल हल्ला
Missile Attack On Israel: Another major missile attack on Israel,Israel attacked the port of Hodeidah in Yemen.The IDF reported on Saturday that a missile was fired from Yemen towards Israel.,


इस्रायल-इराण युद्ध थांबून अजून आठवडाही झालेला नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशात सीजफायर झालं. इराणकडून होणारे हल्ले थांबले असले, तरी इस्रायलवर आता दुसऱ्याबाजूने हल्ले सुरु झालेत.
युद्धविरामची घोषणा होताच सोने – चांदीचे दर गडगडले
इस्रायलच्या सभोवताली हमास, हिजबोल्लाह आणि हुथी या दहशतवादी संघटना आहेत. इराणनेच इस्रायल विरोधात लढण्यासाठी या दहशतवादी संघटना उभ्या केल्या आहेत.
या दहशतवादी गटांना इराणकडूनच सर्व रसद मिळते. इराणच्या इशाऱ्यावरुन हे गट इस्रायलवर हल्ला करत असतात. आता येमेनमधून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती शनिवारी IDF ने दिली.
आता मोटारसायकललाही भरावा लागनार टोल टॅक्स
येमेनच्या बाजूने इस्रायलच्या दिशेने मिसाईल्स येऊ लागल्यानंतर दक्षिण इस्रायलमध्ये सायरन वाजायला सुरुवात झाली. येणारी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम लगेच कामाला लागली.
मराठवाड्यात सत्तर लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
या मिसाइल लॉन्चमुळे दक्षिण इस्रायलच्या अनेक शहरात सायरन वाजत होते. नागरिकांना संभाव्य धोक्याचा आगाऊ इशारा देण्यात आला.
काहीही आठवड्यांपूर्वी येमेनमधील होदेदा बंदरावर इस्रायलने हल्ला केला होता. हुथी बंडखोरांनी अलीकडच्या काही महिन्यात सातत्याने इस्रायलवर मिसाइल हल्ले केले आहेत.
अजित पवार आणि शिंदे गटात नाराजीनाट्य ;महायुतीत पडद्यामागे हालचालींना वेग
या हुथी बंडखोरांना इराणनेच बळ दिलय. त्यांचा वापर ते इस्रायल विरोधात करत असतात. मागच्या 12 दिवसांपासून इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेलं भीषण युद्ध मंगळवारी थांबलं.
आता दोन्ही देशांमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. इशारे, वाद-प्रतिवाद सुरु आहेत. इस्रायलने 12 जूनच्या मध्यरात्री इराण विरोधात कारवाई सुरु केली.
मराठवाड्यात सत्तर लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणचे अणवस्त्र तळ उद्धवस्त केले. इराणची सैन्य ठिकाणं आणि लष्करी अधिकाऱ्यांना इस्रायलने संपवलं.
मागच्या रविवारी अमेरिकेने इराणच्या नतांज, एस्फान आणि फॉर्डो या तीन तळांवर GBU-57 हा हजारो किलो वजनाचा शक्तीशाली बॉम्ब टाकला. त्यानंतर इराणने कतरमधील अमेरिकेच्या अल-उदीद एअरबेसवर हल्ला करुन प्रत्युत्तर दिलं.
प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, कोर्टाने वाढीव मतदानाची याचिका फेटाळली
इराणने डागलेली बहुतांश मिसाइल्स हवेतच नष्ट झाली. युद्धकाळात इराणमध्ये 600 पेक्षा जास्त लोक मारले गेले. इस्रायलच्या बाजूला जिवीतहानीचा आकडा खूप कमी आहे.
भारतात सुरु होतेय Starlink इंटरनेट;पहा स्पीड आणि खर्च किती
पण इराणची मिसाईल्स रोखण्यात इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम कमी पडली. त्यामुळे इस्रायलच आर्थिक नुकसान जास्त झालं.