शिंदे गटाच्या चार नेत्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी

Demand for SIT investigation of four leaders of Shinde group

bj admission
bj admission

 

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममधील पैशांनी भरलेल्या बॅग एक व्हिडिओ व्हायरल समोर आणला होता.

 

 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी तो व्हिडिओ मोर्फ केलेला असल्याचे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण

 

तसेच संजय राऊत यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिला आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 देशांवर 40 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’

यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या चार नेत्यांची नावे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

 

 

संजय राऊत म्हणाले की,व्हिडिओ मॉर्फ केला आहे की काय केलं हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल. तो व्हिडिओ काय आम्ही काढलेला आहे का?

राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न

 

ओरिजनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे. त्यावर आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन करेल की, शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत,

 

 

संजय राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप भाजपचे नेते परिणय फुके यांनीच केलेला आहे.

शिक्षण उपसंचालकावर निलंबनाची कारवाई, SIT चौकशी होणार

संदिपान भुमरे यांनी दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नावावर केली. मला पण त्यांचे ड्रायव्हर व्हायला आवडेल,

 

आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक

असे अनेक लोक मला सांगत आहेत. संजय शिरसाट, उदय सामंत अशा मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आले आहेत,

 

 

त्यांची एकत्रित एसआयटी स्थापन केली पाहिजे. एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणावर भाष्य केले आहे. या विषयावर आता चर्चा फार झाली आणि होत आहे.

 

उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं की, महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत.

 

इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती

त्या जाहीर होऊ द्या. लोकांच्या इच्छा आहेत, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेटा आहे. स्वतः राज ठाकरे यांनी सांगितलंय की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकारतो.

 

नोकरी लावून देतो म्हणून सव्वा कोटी रुपये लुबाडले; गळफास घेऊन आत्महत्या

उद्धव ठाकरे देखील म्हणाले आहेत की, लोकांच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्याही मनात जे आहे ते होईल. त्यामुळे फार चर्चा न करता योग्यवेळी योग्य निर्णय होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

 

Related Articles