धनंजय मुंडे म्हणाले ,त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता-मरता राहिलो
Dhananjay Munde said, In those two hundred days, I kept dying twice


सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
सायबर क्राईम;’फ्री फायर’ गेम मुळे लागला पाच लाखांचा चुना
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर त्यांनी सुमारे 200 दिवस सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली नाही. आता धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर ते व्यक्त झाले आहे. वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात धनंजय मुंडे पहिल्यांदाच आरोपांवर बोलले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलीस गोत्यात; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच आता या प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये घोटाळाच घोटाळा झाल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे म्हणाले ;भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका
आता तरी भ्रष्टाचार समोर आला आहे. भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली, असे अंजली दमानिया म्हणाल्या. यावर आता धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, जीवनात पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने गुणवंतांचा सत्कार करायला मला बोलावलं आहे. आजच्या कार्यक्रमाला पंकजा ताई येणार होत्या.
पदावर असतांना तत्वाच्या गप्पा मारणाऱ्या माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना
पण त्या म्हणाल्या मी मागे राहते, भाऊ चालला आहे. तूच माझ्या वतीने शुभेच्छा दे. त्यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. इतके दिवस तुम्ही बोलावत नव्हता. म्हणून मला येता येत नव्हते.
आता तुम्ही बोलावलं तर मी आलोय. जीवनातला पहिला संघर्ष डोळ्यासमोर मुंडे साहेबांचा पाहिला. जीवनातला प्रवास आठवला तरी आता सुद्धा अंगावर शहारा येतो.
BREAKING NEWS;गृहमंत्री अमित शाह यांचे निवृत्तीबाबत मोठे विधान
स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा होतो. त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून ते जिथपर्यंत पोहचले तेही पाहिलं. जे व्हायला नको होत ते झालं. पण कधी-कधी वाटत की साहेबांची एवढी दूरदृष्टी होती.
मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्री मंडळात बहीण-भाऊ मंत्री झाले नसते. आज जे काही माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे ते सर्व स्वीकारेन. टीका स्वीकारेन, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा.
आता हॉटेलवर दिसणार जिलेबी,समोसा,लाडू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा बोर्ड
जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये. प्रत्येकाने करावं तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा. धनंजय मुंडेंच्या जातीपर्यंत नसावा. धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यापर्यंत आई, बाप, मुलाबाळापर्यंत हे कधीच झाले नाही.
माझ्यासह, जात माझ्यासह इतर जात आणि माझ्यासह माझा जिल्हा एवढा बदनाम करावा. एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नाही,
भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश
ते मी सहन केले. त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता-मरता राहिलोय. तुमच्या कृपेमुळे ही गोष्ट फक्त लहाने साहेबांना माहिती आहे. ज्या समाजात जन्माला आलो, त्याचा अभिमान निश्चित आहे.
अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरं काय हवं? मंत्रिपदाला काय चाटायचं आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
संजय राऊतांनी भाजप खासदार दुबेला दिली तंबी ,दुबेला सांगा……
माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले. नियतीने, न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी कटकारस्थान केलं, त्याच्या विरोधातच लाख रुपयाचा दंड झाला. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही.
भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश
पुढेही संघर्षातून, संकटातून जावं लागेल. संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा. गप्प राहिलो नसतो तर मला जो आजारपणा आला, तो आला नसता. कारण माझा स्वभाव व्यक्त होण्याचा आहे.
माझ्या वाणीवर सुद्धा सरस्वती मातेची कृपा आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ,नसता गांजा लागवडीला परवानगी द्या
माझ्या स्वतःच्या अंगाची, माझ्या कातड्याची जोडी जरी आपल्या पायात घातली तरी ते फेटू शकत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.









