आर्यन खाननं उडवली समीर वानखेडेंची खिल्ली? व्हायरल VIDEO
Aryan Khan mocked Sameer Wankhede? Viral VIDEO
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. आर्यननं अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलंय.
आमदाराचा पुतण्याच प्रतिआमदार बनून थेट सरकारी कार्यक्रमात
त्याची बॅड्स ऑफ बॉलिवूड ही वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
नावावरूनच ही सीरिज एक बॉलिवूड मसला असणार हे लक्षात येतं. गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधल्या घटना या सीरिजमध्ये ट्विस्ट देत पाहायला मिळतात.
भामटे बनावट आयकर अधिकाऱ्यांनी घरावर टाकला छापा
बॉलिवूडचे अनेक कलाकार या सीरिमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये झळकले आहेत.या बिग बजेट सीरिजमधून आर्यननं आपण बॉलिवूडच्या किंगचा मुलगा असल्याचं दिल्याचं म्हटलं जात आहे.
असं असलं तरी आणखी एका कारणामुळं या सीरिजची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांची खिल्ली उडवण्यात आल्याचंही म्हटलं जातंय.
VIDEO;ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा धक्का,आता भारतीयांना भरावे लागणार १ लाख डॉलर शुल्क
काही वर्षांपूर्वी कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खान एका ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर आर्यन खानला अटक करण्यात आली होती.
यानंतर अनेक दिवस आर्यन खान तुरुंगात होता. या प्रकरणात समीर वानखेडींनी जाणिवपूर्वक कार्यवाही केल्याचं म्हटलं गेलं होतं. आता आर्यन खानच्या या वेब सीरिज मध्ये समीर वानखेडे यांच्या सारखा दिसणारं पात्र दाखवण्यात आलं आहे.
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ST प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
आर्यनच्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’या सीरिजमध्ये ड्रग्जविरोधी मोहिम करणारा अधिकारी दाखण्यात आलाय. त्याचा चेहरा आणि समीर वानखेडेंच्या चेहऱ्याच साम्य पाहायला मिळतंय.
हा अधिकारी पोलिसांच्या गाडीतून उतरतो आणि नशा करत असलेल्या एका मुलाकडे जातो. तो मुलगा त्यांना म्हणतो की, मी बॉलिवूड सेलिब्रिटी नाही…तो तिकडे सेलिब्रिटी आहे…
राज्यातील 34 जिल्हा परिषदेअंतर्गत बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई
तर या प्रकरणानंतर शाहरुख खानचा जवान हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्याचा एक डायलॉग चांगलाच चर्चेत आला होता.
‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ असा हा डायलॉग होता. शाहरुखच्या तोंडी असलेला हा डायलॉग समीर वानखेडेंना उद्देशून होता, असं अनेकांनी म्हटलं होतं.
The Sameer Wankhede cameo in the Bads*** of Bollywood Is too good lol.
Iykyk#Badsofbollywood #AryanKhan #ShahRukhKhan𓀠 pic.twitter.com/05PTrvTEsy— PSG24 (@DOCPSG24) September 18, 2025








