मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही ;भुजबळ

Maratha community is not socially backward: Bhujbal

 

 

काही दिवसांपूर्वी एका चॅनलशी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं होतं. आर्थिक निकषावर आरक्षण हवं, अशा अशायाचं विधान त्यांनी केलं होतं,

शुक्रवारपासून पुन्हा पावसाचा हाहाकार ,हवामान विभागाचा मोठा इशारा

त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, सामाजिकरित्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींच्या दणक्याने निवडणूक आयोगाची झिंग उतरली ;घेतला मोठा निर्णय

चार -पाच दिवसांपूर्वी सुप्रिया ताईंनी एका इंग्रजी चॅनलशी बोलताना त्या संदर्भात वक्तव्य केलं आहे. मला असं वाटतं त्यांना त्या संदर्भात कोणी प्रश्न विचारला असेल, ठीक आहे तुमचं ते मत आहे.

 

त्यामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो, हे आरक्षण जे आहे ते गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. गरिबी हटवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देत आहोत. ओबीसी विद्यार्थ्यांना जी मदत देण्यात येते,

गडकरींच्या पापाचा घडा;,टोलमधून मिळालेला पैसा IDL कंपनीमार्फत थेट गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला

तीच मदत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळते. अजूनही ओबीसी समाजामधील विद्यार्थ्यांना त्यांचं वस्तिगृह नाहीये, पण मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वस्तीगृह आहे. व्यावसायासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे.

 

मात्र आरक्षणाचा बेस जो आहे तो आर्थिक नाहीये, नंबर एकचा मुद्दा म्हणजे ज्यांना आरक्षण मिळत आहे, ते सामाजिकरित्या मागास आहेत का? जे सामाजिकरित्या मागास आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पाहा VIDEO;समीर वानखेडेंची ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ वर २ कोटींचा मानहानीचा दावा

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा मराठा समाज हा सामाजिक दृष्या मागास नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भामध्ये हायकोर्टाने निर्णय दिला आहे.

 

चार आयोग देशमुख आयोग, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग सर्वांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही.

राज्यसभेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर

आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्यांना मिळालं पाहिजे, ते कुठल्याही परिस्थितीत आरक्षणात जाऊ शकत नाहीत, कारण ते मागास नाहीत, असंही यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Related Articles