बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा;दोन टप्प्यात मतदान, मतमोजणी 14 नोव्हेंबरला

Bihar Assembly elections announced; Voting in two phases, counting on November 14

 

 

भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा केली आहे. विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

मुंबईत 1200 बोगस परप्रांतीय मतदार वाढल्याने खळबळ

निवडणुकीच्या पहिला टप्प्यासाठी 6 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी 14 नोव्हेंबर 2025 रोजी होईल.

 

22 नोव्हेंबर 2025 रोजी विद्यमान विधानसभेची मुदत संपत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या आठवड्यात 4-5 ऑक्टोबर रोजी बिहारचा दौरा केला होता.

पहिली ते बारावीच्या शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीत बदल

आगामी बिहार विधानसभा निवडणूक 22 नोव्हेंबर आधी होणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. बिहारसोबत सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक देखील होणार आहे.

 

24 जून 2025 पासून निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबवून मतदार याद्या अद्ययावत केल्या असल्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होणार आहे.

 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीच्या 40 दिवसांच्या प्रक्रियेची घोषणा केली. बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे.

पहिली ते बारावीच्या शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीत बदल

पहिल्या टप्प्यात 121 विधानसभा मतदारसंघात 6 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. यासाठीची अधिसूचना 10 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर असणार आहे.

 

उमेदवारी अर्ज छाननी 18 ऑक्टोबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत राहणार असून पहिल्या टप्प्यासाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

.25 लाखांची लाच घेताना मनपा उपायुक्ताला रंगेहात अटक

दुसऱ्या टप्प्यात 122 विधानसभा मतदारसंघात 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी 13 ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली जाईल. 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असेल.

 

21 ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी होईल आणि 23 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये 7 कोटी 43 लाख मतदार आहेत. यातील 3.92 कोटी पुरुष तर 3.50 कोटी महिला मतदार आहेत.

 

1,725 ट्रान्सजेंडर मतदार निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला. 7.2 लाख दिव्यांग मतदार आहेत.

हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला? मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते आक्रमक

तर 85 पेक्षा जास्त वय असलेले 4.4 लाख मतदार बिहारमध्ये आहेत. तरुण मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांची नजर असते, बिहारमध्ये 1.63 कोटी मतदार हे 20 ते 29 वयाचे आहेत. तर 14.1 लाख मतदार (18-19 वय) हे प्रथमच मतदान करणार आहेत.

 

निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार, बिहारमध्ये एकूण 90,712 मतदार केंद्र तयार केले जात आहेत. येथे सरासरी 818 मतदारांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. यातील 76,801 मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ,वकिलाला अटक

तर शहरी भागात 13,911 मतदान केंद्र तयार करण्यात आले. सर्व मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात आली आहे. 1350 मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत, यामुळे मतदारांना अधिकाधिक उत्तम सुविधा मिळणार आहेत.

 

बिहारही पावन भूमी आहे. जगातील पहिले लोकशाही राज्य वैशाली हे बिहारमध्ये होते. नालंदा हे जगातील प्राचीन विद्यापीठ देखील बिहारमध्ये होते.

247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर

येथे जगभरातील विद्वान शिक्षणासाठी येत होते. धर्म, संस्कृती आणि सभ्यतेचा अलौकिक संगम येथे होत होता. आर्यभट्टची ही जन्मभूमी आहे. छठ हा बिहारमधील महत्त्वाचा सण मानला जातो.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच आम आदमी पार्टीने पहिली उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत बेगूसराय, कुशेश्वरनाथन, सरैया,

 

कस्बा, बेनीपट्टी, फुलवारी शरीफ, बांकीपूर, किशनगंड सदर, परिहार, गोविंदपूर आणि बक्सर येथील उमेदवारींची घोषणा केली आहे.

 

 

Related Articles