डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा वार, मुंबईतील 7 कंपन्या अन् 8 भारतीयांवर बंदी
Donald Trump strikes again, bans 7 Mumbai-based companies and 8 Indians
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ऑगस्टमध्ये भारतावर 25 टक्के टॅरिफसहित रशियाचा व्यापार करत असल्याने अतिरिक्त 25 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला.
आता भारतीय कंपन्यांचे आणि भारतीयांचा इराणशी असलेले संबंध अमेरिकेला खुपत आहेत. त्यामुळे अमेरिकेने भारतीय कंपन्या आणि भारतीय व्यक्तींवर कारवाई केली आहे.
इम्तियाज जलील जाहीर सभेत नितेश राणेंना म्हणाले छोटा चिंटू
यात 7 मुंबईतील कंपन्यासंहित इतर दोन भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. तसेच 8 भारतीय व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेने आरोप केला आहे की, या कंपन्या आणि कारवाई करण्यात आलेले व्यक्ती हे इराणचे तेल,
पेट्रोलियम उत्पादने आणि पेट्रोकेमिकल्समध्ये सहभागी आहेत. अमेरिका परराष्ट्र विभागाने इराणच्या पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या व्यापारात सहभागी अल्याबद्दल 40 व्यक्ती,
ओबीसी मोर्चातून सरकारला इशारा,नेते म्हणाले आमदारकी खड्ड्यात गेली
संस्था आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. इराणच्या राजवटीच्या कारवाया रोखण्यासाठी हा निर्बंध असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या संस्थांनी सामूहिक रुपात अब्जावधी डॉलरच्या पेट्रोलियम
इम्तियाज जलील जाहीर सभेत नितेश राणेंना म्हणाले छोटा चिंटू
आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीसाठी मदत केली आहे. यामुळे इराणला दहशतवादी गटांना पाठिंबा देण्यासाठी पैसे मिळत आहेत. हे अमेरिकेसाठी धोकादायक आहे.
या दोन्ही विभागांद्वारे जारी करण्यात आलेल्या यादीत 8 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्यांना अमेरिकेने स्पेशयली डेझिग्नेटेड नॅशनल्स अँड लॉक्ड पर्सन्स या यादीत समाविष्ट केले आहे.
रेनकोट,छत्र्या कपाटात ठेवा ;पावसाचा परतीचा प्रवास सुरू
या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांना आणि कंपन्या अमेरिकेतील नागरिकांशी व्यापार करु शकत नाहीत तसेच त्यांना अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
या यादीत मुंबईतील सीजे शाह अँड कंपनी, केमोविक, मोदी केम, पारिकेम रिर्सोर्सेस, इंडिसोल मार्केटिंग, हरेश पेट्रोकेम आणि शिव टेक्सकेम दिल्लीतील बीके सेल्स कॉर्पोरेशन समाविष्ट आहेत.
परभणी जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर
बंदीची कारवाई करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये केमोविकचे संचालक पीयूष जाविया, इंडिसोल मार्केटिंगचे संचालक नीती उन्मेश भट्ट, हरेश पेट्रोकेमचे संचालक कमला कसाट, कुणाल कसाट आणि पूनम कसाट वरुण पुला, इयप्पन राजा आणि सोनिया श्रेष्ठ यांचा समावेश आहे.








