अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ वाढले
The mystery surrounding Ajit Pawar's plane crash has deepened.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद आमदार अमोल मिटकरींनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताबद्दल आपल्या मनात अनेक शंका असल्याचं म्हटलं आहे.
‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात
ज्या परिस्थितीमध्ये हा अपघात झाला ती पाहता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असं मिटकरींनी म्हटलं आहे.
अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर विमान लॅण्डींगदरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये निधन झालं. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने त्यांची कर्मभूमि असलेल्या बारातमीबरोबरच संपूर्ण राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वात आशादायी नेतृत्वांपैकी एक होतं. “महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्वांपैकी एक असलेले अजितदादा आज आपल्यात नाही. जिल्हापरिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला येत होते.
महापालिकेच्या १६ नगरसेवकांवर निलंबनाची मागणी
त्यांच्या प्रवासादरम्यान अचानक मार्ग बदलण्यात आला. वैमानिक बदलण्यात आला. अपघात झाला त्या ठिकाणी कागदाचा एक तुकडाही जळालेला नाही. मात्र मृतदेह पूर्णपणे जळालेले. यावरुनच शंका घेण्यास वाव आहे,” असं मिटकरींनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.
“मी अपेक्षा करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी लावतील. त्यांनी आश्वासन दिले आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाईल.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासाठी सर्वात मोठी अट
मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील आठवड्यात मी ही भेट मिळेल असे प्रयत्न करणार असून या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली पाहिजे अशी मागणी करणार आहे,” असं मिटकरींनी म्हटलं आहे.
मिटकरींनी विमानामध्ये सहा व्यक्ती होत्या असा दावाही केला आहे. एवढ्यावरच न थांबता सुरुवातीला विमानात स्फोट झाल्याने अजित पवारांचा मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हता.
शरद पवारांची सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर पहिली मोठी प्रतिक्रिया
मात्र त्यांच्या हातातील घड्याळावरुन मृतदेह ओळखण्यात आल्याचं सांगितलं गेलं. पण आता मिटकरींनी अजित पवारांचं घड्याळ सापडलेलं नाही असा दावा केला आहे.
हे घड्याळ गेलं कुठे असा सवाल त्यांनी केला आहे. अमोल मिटकरींनी केलेल्या दाव्यामुळे आता आधीपासूनच या अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच त्यात या घड्याळाचंही गूढ वाढलं आहे.
आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कमान कोणाच्या हाती ? उत्तर सापडले
एअरक्राफ्ट अॅक्सिडंट इनव्हेस्टीगेशन ब्युरोने या प्रकरणाचा औपचारिक तपास सुरु केला आहे. मिटकरींनी आपण उपस्थित करत असलेल्या शंका आणि प्रश्न हे जनतेच्या हिताचे असून त्यांना अफवा समजलं जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसेच अशा महत्त्वाच्या व्यक्तींसाठी जेव्हा ठराविक विमानाची निवड केली जाते त्यासंदर्भात काही निकष आहेत का? अशा विमानांच्या सुरक्षेची कोणती काळजी घेतली जाते? यासारखे प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत.
“या” जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पावसाचा









