रशियात मेडिकल कॉलेजच्या भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला
Indian students at a medical college in Russia were attacked.
रशियात एक धक्कादायक घटना घडली आहे. रशियाच्या एका मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अचानक इतर विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला आहे.
शरद पवारांची सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर पहिली मोठी प्रतिक्रिया
यामुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थ्यांसह इतर परदेशी विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अचानक हॉस्टेलमध्ये घुसून हा हल्ला केला आहे. आरोपीने पोलिसांवरही हल्ला केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (०७ फेब्रुवारी) रशियाच्या बश्कोर्तोस्तान प्रांताची राजधानी उफा येथील वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये घडली आहे.
ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा
प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन तरुण कोणतीही परवानगी न घेता हॉस्टेलच्या परिसरात घुसला. हॉस्टेलच्या परिसरात घुसताच्या त्याने विद्यार्थ्यांवर अचानक चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळून लागले. मात्र या हल्ल्याच काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रशियाच्या स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी पळून जाण्याच्या फिराकमध्ये होता. पोलिसांशी त्याची झटापटही झाली.
राहुल गांधींच्या आव्हानामुळे मोदी बँक फुटावर, मोदींच्या भाषणाशिवाय लोकसभेत आभार प्रस्ताव गुंडाळला
यामध्ये आरोपीने एका पोलिसावरही हल्ला केला. हल्लेखोरही जखमी झाला असून त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत.
तसेच आरोपीसह इतर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणावर कायदेशीर कारवाई सुरु असून हा हल्ला का करण्यात आला याचा शोध घेतला जात आहे.
ऑनलाईन फसवणूक प्रकरणात आता बँक जबाबदार नाही ?
दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच रशियातील भारतीय दूतावासाने घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कझान येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उफाकडे रवाना झाले आहे.
दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असून जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक ते उपचार पुरवण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीही लवकर व्हावी असे म्हटले आहे. सध्या जखणींच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सरकारी यंत्रणा हादरली ;लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा
परंतु या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रशियाच्या तपास यंत्रणांनी या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. हल्ल्या का झाला, याचा उद्देश काय होता,
तसेच हल्लेखोराचा विद्यार्थ्यांची किंवा हॉस्टेलशी काही संबंध होता का या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. लवकरच या घटनेची संपूर्ण माहिती देण्यात येईल असे तपास यंंत्रणांनी म्हटले आहे.
अजित दादांच्या विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल








