धनगर समाजाकडून सुनेत्रा पवार यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न
Attempt by the Dhangar community to politically corner Sunetra Pawar.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदासंघाच्या जागेसाठी पोटनिवडणुक पार पडणार आहे.
या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याने महाविकास आघाडी आणि पर्यायाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही उमेदवार दिला जाणार नाही,
असं खासदार सुप्रिया सुळेंबरोबरच 2025 ला अजित पवारांविरोधात लढलेले त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांनी स्पष्ट केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केलेली.
अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव
कोणताही मोठा पक्ष सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नसला तरी या ठिकाणी धनगर समाज मात्र निवडणूक बिनविरोध करण्याच्या विरोधात असून थेट सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवण्याची तयार करत आहे.
अचानक धनगर समाज पवाराच्या बालेकिल्ल्यात पवारांच्याच घरातील सुनेच्या विरोधात का उभा राहिला आहे? सुनेत्रा पवारांविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके निवडणूक लढतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
एकीकडे अजित पवारांसंदर्भातील आदर आणि त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या सन्मानार्थ सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्यासाठी कोणीही तयार नसताना धनगर समाज एवढा आक्रमक का झाला आहे? यामागे नेमकं कारण काय आहे? याबद्दल जाणून घेऊया
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन
यशवंत ब्रिगेड सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर समाज ही निवडणूक असं जाहीर केलं आहे.
समाज बांधवांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून आहिल्याबाई होळकरांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असं सोलनकरांनी सांगितलं आहे.
शिंदेंनी दिली कबुली, इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता
बारामती लोकसभेच्या उमेदवारीबाबत तेथील कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार, असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये बिनविरोधात निवडणूक लोकशाहीला मारक असल्याचंही हाके म्हणालेत.
“बारामती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आलेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. पवार घराणं प्रोफेशनल राजकारण करत आहे,” असं हाके म्हणाले.
मुंबईतील इंजिनिअरचा इराकमध्ये भयानक मृत्यू
पुढे बोलताना, “लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणं हे लोकशाहीला घातक आहे. निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी साधन असतं,” असं हाकेंनी म्हटलं आहे.
संपूर्ण धनगर समाज सुनेत्रा पवारांविरोधात आणि त्या माध्यमातून सत्ताधारी आघाडीच्या विरोधात उभं राहण्यामागे कारण ठरत आहे एक नामकरणाचा निर्णय. या निर्णयावरुन यापूर्वी बारामतीमध्ये आंदोलनही झालं आहे.
मात्र आता या आंदोलनानंतर थेट मतपेटीमधून धनगर समाज आपली ताकद दाखवण्याची तयारी करत आहे. बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाच्या नामकरणावरून
1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहात अटक
ओबीसी तसेच धनगर समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी याच मुद्द्यावर 9 मार्च 2026 रोजी बारामतीत मोर्चा काढला आणि आंदोलन केलं होतं.
महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या महायुती सरकारने बारामतीमधील वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे असेल असं ठरवलं होतं. मात्र संलग्न रुग्णालयाचे नाव स्वर्गीय अजितदादा पवार जनरल हॉस्पिटल असे बदलले जाईल,
अवकाळीचे सावट, महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
असा शासन आदेश काढला. 31 मे 2023 रोजी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने शासन आदेश काढून संपूर्ण संस्थेला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले होते.
आता फक्त रुग्णालयासाठी अजित पवारांचं वेगळे नाव देण्याचा प्रयत्न होत असल्याने धनगर समाज नाराज झाला आहे. होळकर घराण्याच्या वारसदारांनीही नाव बदलू नये अशी विनंती केली होती.
युद्धाचा परिणाम : अंड्यांच्या किमतीत 30-40% घसरण
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून त्याऐवजी अजित पवार यांचे नाव देण्याच्या हालचालींमुळे धनगर समाज आणि सकल हिंदू समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.
अजित दादांबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु अहिल्यादेवींचे नाव पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही,”अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे.
RSS वर बंदी घाला, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी
यामुळे ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे, असं यशवंत ब्रिगेड सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
लक्ष्मण हाकेंनी याचविरोधात 9 तारखेला बारामतीत निषेध मोर्चा काढला. आपल्या भाषणामध्ये हाकेंनी सरकारला अल्टिमेटम देताना, “नाव बदलण्याचा प्रयत्न झाला तर केवळ बारामतीत नव्हे,
उष्णतेची लाट; ‘येलो अलर्ट जारी, २ दिवस महत्त्वाचे
तर संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडले जाईल,” असंही म्हटलं. हाकेंनी आपली भूमिका मांडताना, अहिल्यादेवी होळकर या ऐतिहासिक व सामाजिक दृष्ट्या आदर्श व्यक्ती आहेत.
त्यांच्या नावाशी नामकरणाच्या माध्यमातून केली जाणारी ‘छेडछाड’ सहन करणार नाही. हा समाजाचा आणि त्या व्यक्तीचा समाजिक अपमान असल्याची भावना व्यक्त केली.
गॅंगवॉर आता नांदेडपर्यंत , नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोटाच्या फोनमुळे खळबळ
सोलनकर यांच्याप्रमाणेच हाकेंनी अजित पवारांच्या नावाला विरोध नसल्याचं म्हटलं आहे. फक्त अजित पवारांचं नाव देण्यासाठी आहिल्याबाईंचं आधीपासून देण्यात आलेलं नाव हटवणं समाजाला पटलेलं नसल्याचं हाकेंनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार यांचे योगदान मोठे आहे, पण त्यांचे नाव दुसऱ्या ठिकाणी द्या, अशी मागणी करताना हाकेंनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र, विमानतळ,
राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार !
विद्या प्रतिष्ठान किंवा अॅग्रो सेंटरला अजित पवारांचे नावे द्यावे असं सुचवलं आहे. “अजित पवारांचे नाव द्यायचे असेल तर दुसऱ्या संस्थेला द्या, पण अहिल्यादेवींच्या नावावर हात न टाका,” असं हाकेंनी भाषणात म्हटलं.
लक्ष्मण हाके यांनी आजच म्हणजेच 17 मार्च रोजी बारामतीत जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. हाके हे स्वतः निवडणूक लढण्याबाबत विचार करत आहेत.
त्यामुळे अजित पवारांच्या नावावरुन सुरु झालेल्या या वादाचे पडसाद थेट पोटनिवडणुकीवर उमटणार अशी चिन्हं दिसत आहेत.डोनाल्ड ट्रम्प आले गुडघ्यावर ,अमेरिका-इराण युद्ध थांबण्याचे संकेत









