अशोक खरातकडून मुख्यमंत्री होण्यासाठी अघोरी पूजा

Ashok Kharat Performs Occult Ritual to Become Chief Minister

 

 

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

सोनं अजून किती स्वस्त होणार?

“भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे या अशोक खरातसोबत अत्यंत जवळचे संबंध होते. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अशोक खरातकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळत आहे,” असा दावा सपकाळ यांनी केला आहे.

 

हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

विधान परिषदेच्या 9 जागासाठी होणार निवडणूक ,कोणाची लॉटरी लागणार ?

“सरकारने भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री व दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील. अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता.

 

फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत,” असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाबद्दल आधीच माहिती होती, असा दावाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. “भोंदूबाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहीत होते.

डोनाल्ड ट्रम्प आले गुडघ्यावर ,अमेरिका-इराण युद्ध थांबण्याचे संकेत

मुख्यमंत्र्‍यांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे अशोक खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही त्यांनी काही कारवाई केली नव्हती.

 

पण फडणवीस यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनीच त्यांचे मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी अशोक खरातकडून तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात याच्याविरोधात कारवाई सुरू केली,” असा दावा सपकाळ यांनी केला आहे.

 

रोहित पवार यांचा प्रफुल पटेल यांच्यावर थेट निशाणा

दरम्यान, अशोक खरातच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता महायुतीतील मित्र पक्ष आणि आपल्याच पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत,” असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

Related Articles