अशोक खरात सरकारचा माणूस, त्याचासोबत 40 आमदार
Ashok Kharat is the government's man, and he has 40 MLAs with him.
अशोक खरातच्या ) संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे. खरात सरकारचा माणूस आहे. त्याचापाठी 40 आमदार आहेत, असा दावा करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात?
छगन भुजबळ म्हणतात की राज्यामध्ये गॅस टंचाई आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताय की सर्व काय बरं आहे. सर्वात पहिले लॉकडाउन होणार आहे हे गुजरातच्या लोकांना माहित पडलंय आणि मग सर्वात मोठी रांग गॅससाठी गुजरातमध्ये लागली असल्याचा दावा ही खासदार संजय राऊतांनी केला आहे.
अशोक खरात हा भोंदू बाबा तर आहेच. सोबतच दीपक केसरकर, एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, यांचीही चौकशी करा, अशी मागणीही खासदार संजय राऊतांनी केली आहे.
कौन बनेगा करोडपती मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदारला अटक
अमित शाह यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहचला याची ही चौकशी करा. अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्री यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणी देणं चुकीचं आहे.
पण गुन्हा कधी झाला आहे आता सरकार कोणाचा आहे? जयंत पाटील यांनी जर पाणी दिलं तर का त्यात चुकीचा आहे? महत्वाचा आहे की महिलांचा शोषण झाला आहे ते महत्वाचं आहे. असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
युएईत मिसाईलचा मलबा पडला, 5 भारतीय जखमी
एकनाथ शिंदे यांना अशोक खरात यांच्याकडे नेणारे दीपक केसरकर होते. ट्रिडेन्ट हॉटेलमध्ये, शिक्षण खात्यामध्ये सर्व बदल्या आणि बडतर्फी अशोक खरात यांचा नेतृत्व मध्ये होता होत्या. असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आज खरातची पोलीस कोठडी संपत असून, त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
तपासादरम्यान आतापर्यंत काय माहिती समोर आली, याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला जाऊ शकतो.
त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून, न्यायालयाने खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीची कोठडी संपल्यानंतर
आज त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीत सरकारी पक्ष, तपास यंत्रणा आणि बचाव पक्ष यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष तपास पथकाचे (SIT) तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्यासह पथकातील इतर अधिकारी कोर्टात उपस्थित होते.
सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी मांडली, तर आरोपीच्या बाजूने वकील सचिन भाटे उपस्थित होते. सुनावणी न्यायमूर्ती एम. व्ही. भराडे यांच्या न्यायालयात झाली.
सुनावणीदरम्यान तपास अधिकारी सूर्यवंशी यांनी आरोपीला समक्ष घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रकरणात काही ‘कोडवर्ड’ वापरले गेल्याचा संशय असून त्याचा उलगडा करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकारी वकीलांनीही आरोपी हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करत, त्याच्या मोबाईलमधील डेटा तपासणे, जंगम मालमत्तेचा शोध घेणे आणि त्याच्याशी संबंधित इतर बाबींची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली.
त्यांनी सांगितले की, आरोपीने डमी नावे वापरून काही संवेदनशील माहिती लपवली असण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप करत तपासासाठी अधिक वेळ देण्याची विनंती करण्यात आली.
पीडित महिलेच्या वतीने वकील एम. वाय. काळे यांनीही न्यायालयात बाजू मांडताना आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून, पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी तपास यंत्रणेला अधिक वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बचाव पक्षाचे वकील सचिन भाटे यांनी या सर्व आरोपांना विरोध करत, तपास यंत्रणेकडे आधीपासूनच आवश्यक पुरावे असूनही वाढीव कोठडीची मागणी केली जात असल्याचा दावा केला.
मोबाईलची क्लोन कॉपी आधीच उपलब्ध असल्याचे सांगत, आणखी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे त्यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत खरातविरोधात १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी 8 गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.
तपास यंत्रणेनुसार, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता आहे. तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे आरोपीला समक्ष घेऊन चौकशी करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अखिल भारतीय आदी महासंघ ची राष्ट्रीय कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न








