ट्रम्पच्या डेप्युटीने इराण युद्धावरुन PM नेतान्याहूंना सुनावलं

Trump's Deputy Rebukes PM Netanyahu Over Iran War

 

 

इराण युद्ध सुरु होऊन महिना झाला आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायल च्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. नेतृत्व हरपल्यानं इराण पुढच्या काही दिवसांत शरणागती पत्करेल,

आता पेट्रोल-डिझेल साठी ॲपवर बुकिंग आवश्यक

असा अमेरिका-इस्रायलचा अंदाज होता. पण तो फोल ठरला. इराणनं महिनाभर कडवी लढत दिली. त्यामुळे आता इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढू लागला आहे.

सरसगट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही :पात्रतेबाबत अजूनही संभ्रम

AXios च्या वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात वाद झाला. यावेळी वेन्स यांनी नेतान्याहू यांना बरंच सुनावलं.

 

इराण युद्धाच्या परिणामांवरुन दिशाभूल केल्याचा दावा वेन्स यांनी केला. नेतान्याहू यांनी अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध सुरु करण्याआधी बरीच चुकीची माहिती दिल्याचं वेन्स आणि नेतान्याहू यांच्या फोन कॉलवरुन स्पष्ट झालं आहे.

१ एप्रिलपासून RBI कडून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत बदल

युद्ध सुरु होण्याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणमधील सत्तांतर अतिशय सोपं असेल, असं म्हटलं होतं. त्यांनी तसा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता. ही मोहीम सोपी असेल आणि सत्तांतराची शक्यता खूप जास्त आहे, असं नेतान्याहूंनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलेलं नाही.

 

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूला महिना लोटला आहे. त्यानंतरही इराणकडून जोरदार पलटवार करत आहे. यात अमेरिका, इस्रायलचं प्रचंड नुकसान झालं आहे. यावरुन आता दोन्ही देशांत जुंपल्याचं दिसतं.

 

रविवार असतानाही तब्बल १०३ निर्णय जाहीर
अमेरिकेचे उपाध्यक्ष असलेल्या जेडी वेन्स यांनी इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांना बरंच सुनावल्याचं समजतं. इस्रायली पंतप्रधानांनी इराणमधील सत्तांतराची मोहीम अतिशय सोपी असल्याचं भासवलं होतं. तसं चित्र त्यांनी ट्रम्प यांच्या समोर उभं केलं. पण प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही. त्यामुळे वेन्स यांनी नाराजी व्यक्त केली.

 

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका
इस्रायल जाणूनबुजून उपाध्यक्ष वेन्स यांची प्रतिमा खराब करत असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यानं केला आहे. इस्रायलच्या काही अधिकाऱ्यांना वेन्स यांचा इराणबद्दलचा पवित्रा फारसा आक्रमक वाटत नाही.

 

जेडी वान्स अमेरिकन राजदूत स्टिव विटकॉफ आणि जेरेज कुशनर यांच्या सोबत इराण युद्ध रोखण्यासाठी चर्चा करत आहेत. तर इस्रायलची भूमिका वेगळी आहे. युद्ध सुरु राहावं असं इस्रायलच्या नेतृत्त्वाला वाटतं. त्यामुळे दोन देशांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

तापमान वाढणार; विजांसह पावसाची शक्यता

Related Articles