प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात मोठा बदल केला

Praful Patel and State President Sunil Tatkare made a major change to the Nationalist Party's constitution.

 

 

अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानाता ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा बदल केल्याची तोफ आमदार रोहित पवारांनी डागली.

एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांना नारळ देणार; मंत्रिमंडळात लवकरच उलटफेर

अजितदादांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार हे या दोन्ही नेत्यांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. संधी मिळताच ते दोन्ही नेत्यांवर प्रहार करत आहेत.

मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

आता त्यांनी अजून एक मोठा बॉम्ब गोळा टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बदल केला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

राज्यभरात अवकाळीचा तांडव: विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; आज कुठे हाय अलर्ट?

राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात केलेले बदल रद्द करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पत्र पाठवल्याचा दावाही रोहित पवारांनी केला आहे.

 

या बदल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन संविधानात पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल,सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल हे काढून टाकण्यात आले आहेत.

रविवार असतानाही तब्बल १०३ निर्णय जाहीर

जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जवळपास ७ फ्रंटल सेल नमूद होते. आत्ता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जे बदल करण्यात आले आहेत त्या मधे युवक,विद्यार्थी,महिला आणि सेवादल याच सेलचा उल्लेख पाहायला मिळत आहे.

 

पक्षाच्या संविधान मधे या पद्धतीने बदल करण्यात आला आहे हे समजताच सुनेत्रा पवार यांनी हे सर्व बदल रद्द करण्यात यावे असा पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.

 

१ एप्रिलपासून RBI कडून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत बदल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी बदल केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. या बदलामुळे अल्पसंख्याक, ओबीसी आणि सामाजिक न्याय हे सेल नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

रोहित पवार हे वारंवार या दोन्ही नेत्यांवर आरोप करत आहेत. हे दोन्ही नेते त्यांच्या टार्गेटवर आल्याचे दिसते. तर दोन्ही राष्ट्रवादीत चेकमेट सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

तापमान वाढणार; विजांसह पावसाची शक्यता

त्यात अजितदादातील काही नेत्यांविरोधातील प्रकरणं समोर आणली जात असल्याने पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे दिसते.

 

Related Articles