भुजबलचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये उतरवले ,चर्चेला उधाण
Bhujbal's Helicopter Lands Directly in Car Parking; Sparks a Flurry of Speculation

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आज घडलेल्या हेलिकॉप्टर लँडिंगच्या प्रकारावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. “हा अपघात नाही,
मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याला लाच घेताना बेड्या ठोकल्या
आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सीबीएसई इंटरनॅशनल शाळेच्या उद्घाटनासाठी आलेले हे हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर न उतरता थेट गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, भुजबळांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी हेलिपॅड स्पष्ट न दिसल्यामुळे पायलटकडून निर्णय घेण्यात आला आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पार्किंग परिसरात हेलिकॉप्टर उतरवण्यात आले.
पार्थ पवार म्हणाले आता ‘काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल…ऐकुन ‘शरद पवार हसले
घटनेच्या वेळी शाळेचा परिसर, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचानक हेलिकॉप्टर खाली उतरताना पाहून काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले,
मात्र कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही. “फक्त तांत्रिक कारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, याला अपघात म्हणणे चुकीचे ठरेल,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “आपण सर्व सुरक्षित बाहेर आलो आहोत, त्यामुळे विनाकारण अफवा पसरवू नयेत,” असे त्यांनी सांगितले.
याच वेळी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी काही सामाजिक मुद्द्यांवरही भाष्य केले. अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन करत समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही प्रकरणांवर सरकारकडून लक्ष ठेवले जात असून योग्य ती कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरबाबतची नवी अपडेट
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षितातेबाबत विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी “त्या सुरक्षित आहेत, काळजी करण्याचे कारण नाही,” असे सांगितले.
या घटनेनंतर प्रशासनानेही तात्काळ चौकशी सुरू केली असून हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान नेमकी कोणती तांत्रिक अडचण निर्माण झाली याचा आढावा घेतला जात आहे. सुदैवाने या प्रकारात कोणतीही दुर्घटना घडली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले आहे.









