जिल्हाधिकाऱ्यांचे ड्रॉयव्हर जाणार संपावर

District Collector's Drivers to Go on Strike

 

 

नाशिकमधील शासकीय, निम शासकीय आणि जिल्हा परिषद वाहनचालकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. शासकीय, निम शासकीय जिल्हा परिषद वाहन चालक येत्या 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

मोदी सरकारच्या विरोधात राज ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा

त्यांच्या संपावर जाण्यामुळे अनेक शासकीय अधिकाऱ्यांना आणि शासनाच्या कामाला कदाचित उशीर होण्याची शक्यता आहे. वर्ग 3 च्या कर्मचारी संघटनेने वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी ही बेमुदत संपाची हाक दिलेली आहे.

 

बेमुदत संपाविषयीची माहिती वाहन चालकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रातून दिलेली आहे.

शासकीय, निम शासकीय आणि जिल्हा परिषद वाहनचालकांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्यामुळे त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे.

महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात काही ठिकाणी शळांना सुट्टी;नागरिकांना सतर्कतेचं आवाहान

त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मासिक वेतनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी संपाची हाक दिली आहे. मुंबई मध्ये गेल्या मार्च महिन्यामध्ये दोनदा वाहन चालकांच्या समन्वय समितीची बैठक झाली होती.

 

त्यातील एका बैठकीमध्ये, वाहन चालकांच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल शासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते. शासनातील प्रमुख मंत्र्यांची भेटी घेऊन आणि हिवाळी अधिवेशनावेळी उपोषण करूनही त्याची शासनाने दखल घेतली नाही. म्हणूनच, गेल्या महिन्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले भोंदू खरातकडे का गेले ?

नाशिक जिल्ह्यातील शासकीय आणि जिल्हा परिषद विभागातील सर्व वाहन चालक या बेमुदत संपामध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे इतरत्र अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये पोहोचणं फारच डोकेदुखीचं ठरणार आहे.

 

“अनेकदा आंदोलने करूनही, निदर्शने करूनही आम्हाला शासनाकडून आश्वासनाशिवाय दुसरं काहीही मिळालेलं नाही. त्यामुळे आता आमच्याकडे बेमुदत संपाशिवाय दुसरा कोणतंही पर्याय उरलेला नाही.

सरसगट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही :पात्रतेबाबत अजूनही संभ्रम

“, अशी प्रतिक्रिया संघटनेकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान, हे बेमुदत संप जो पर्यंत वाहनचालकांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होत नाही,

 

तोपर्यंत कायम चालूच राहणार आहे. या संपामुळे नाशिक जिल्ह्यातील शासनातील कर्मचाऱ्यांची ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच धांदळ उडणार आहे.

22 राज्यांना पावसाचा अलर्ट

 

Related Articles