भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचं मानवतावादी समर्पित धम्मकार्य भारतीय समाजासमोर आदर्शवत

Bhadant Dr. Upagupta Mahathero's humanitarian dedicated Dhamma work as an ideal for the Indian society

 

बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचा जन्मदिन 9 ऑक्टोबर 2024 बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवराच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

 

भदंत पयावंश यांच्या संयोजना खाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पूर्णा नगरपालिकेचे माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते अनिल खर्ग खराटे हे होते

 

 

प्रमुख धम्मदेशना मिलिंद महाविद्यालयाचे पाली विभाग प्रमुख भदंत डॉ. सत्यपाल महाथे रो भदंत पैयाबोधी विपश्यनाचार्य भदंत पयारत्न भदंत शील रत्न भदंत रेवतबोधी यांची होती.

 

प्रास्ताविक भदंत पै यावंश यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून परभणी मतदार संघाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष  डॉक्टर सिद्धार्थ हत्तीआंबिरे

 

नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश गायकवाड  संपादक प्राचार्य गणेश जोशी गेस्ट आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे नगरसेवक मधुकर गायकवाड

 

एडवोकेट धम्मदीप जोंधळे एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड देवराव खंदारे मुकुंद भोळे विरेश कसबे अशोक धबाले सुनील कांबळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड इंजिनीयर पीजी रणवीर ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे आदींची उपस्थिती होती.

यावेळी परभणी मतदार संघाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आपल्या शुभेच्छा पर भाषणामध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकताना संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये व भारत देशामध्ये डॉ. उपगुप्त महाथेरो यांचा धम्मकार्य त्यांनी निर्माण केलेली बुद्ध विहारे आदर्श संस्कार केंद्र झाली आहेत.

 

पूर्णा येथील बुद्ध विहाराला सर्वोत्परी विकास कामे करण्यासाठी प्रयत्नरत राहिल. त्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही .
काँग्रेस अनुसूचित जाती सेल चे प्रदेशाध्यक्ष व धम्म कार्यामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांनी

 

डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचा गौरवपूर्ण शब्दांमध्ये उल्लेख करताना म्हणाले त्यांचं धम्मकार्य भारत देशातच नाही तर विदेशात सुद्धा आहे.त्यांच्या संस्कारातून माझ्या विचाराची जडणघडण झाली. थायलंड या देशातून आणलेले चिवर फलदान धम्मदान देऊन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचा श्रद्धा भावनेने त्रिवार वंदन करून सन्मान केला.

 

 

श्रद्धा संपन्न उपसिका उपासक महिला मंडळ यांच्या वतीने चिवरदन फळ दान व आर्थिक दान देण्यात आले.
विहार समितीच्या वतीने भोजन दान उपस्थितांना देण्यात आले.

 

कार्यक्रम यशस्वी कर न्यासाठी अतुल गवळी त्रांबक कांबळे राहुल धबाले रामू भालेराव विजय खंडागळे सूरज जोंधळे बाळू कांबळे सोनू काळे राजू जोंधळे व महिला मंडळांनी परिश्रम घेतले.आशीर्वाद गाथेने समारोप करण्यात आला.
सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *