उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल म्हणाले अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान…

Uddhav Thackeray's attack on Chief Minister said Adani is our life and we are Shetji's dog...

 

 

 

शिवाजी पार्कवर येथील शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. गोमुत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व होते म्हणून भाजपला लाथ घातली.

 

मिंध्यांना सांगा हे..जाहिरात दिलीय त्यांनी एक…हिंदुत्व आमचा प्राण..अदानी आमची जान व आम्ही शेटजींचे श्वान.. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

 

ही शिवसेना नाही तर ही वाघनखं आहेत,जी बाळासाहेबांनी मला दिली आहेत. येवू देत त्यांच्या कितीही पिढ्या,गाढून टाकू त्यांना. टाटांसारखे उद्योगपती वेगळे असतात. आताचे उद्योगपती मिठागरे गिळतायत.

 

मिठागरे गिळणार का जात नाहीत.जे जायला हवेत ते जात नाहीत. कौरव माजले होते…शकुनीमामा कोण तुम्हाला माहिती आहे. भाजपला आम्ही खांद्यावर घेवून फिरवले..आता भाजपला आम्हाला खांदा द्यायचा आहे. आपल्यासमोरचा तो शत्रू..त्याला ठेचावाच लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

संघाने चिंतन शिबीर घ्यावे आणि आत्ताचा जो भाजप आहे तो संघाच्या विचारसरणीवर चालतोय हे शोधल पाहिजे. गद्दांरांना एकत्र राज्य करत आहेत. हिंदूत्व म्हणजे काय? गाईला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला आहे.

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. पण महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? आधी आईला वाचवा मग गाईला वाचवा. राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. महिलांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उद्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

 

जोपर्यंत अदाणींचं सगळे काम होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नसल्याचं असं मला एका अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे म्हणालेत.

 

अनेक प्रकल्प मित्रांना वाटप करणं सुरूये . ते थांबवण्यासाठी आपल्याचा एकजूट दाखवायची असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात म्हटलंय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *