IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे जडले गँगस्टरवर प्रेम

IAS officer's wife's love for a gangster

 

 

 

 

गुजरातच्या एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने शनिवारी विषप्राशण केलं, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिला गांधीनगर

 

येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, रविवारी (२१ जुलै) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी आणि त्यांच्या पत्नी गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत होते. आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नी या तामिळनडूच्या राहणाऱ्या होत्या.

 

त्यांचे येथील गँगस्टर हाय कोर्ट महाराजसोबत संबंध होते. इतकंच नाही तर तामिळनाडून एका १४ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाच्या प्रकरणातही त्याचं नाव आलं होतं.

 

या गँगस्टरने आपला साथीदार सैंथिल कुमारला सोबत घेत ११ जुलैला एका मुलाचं अपहरण केलं होतं आणि दोन कोटी रुपयांची

 

खंडणीही मागितली होती. मात्र, पोलिसांनी या मुलाची सुटका करण्यात यश मिळवलं. त्यानंतर पोलीस आयएएस यांच्या पत्नीच्या शोधात होते.

 

आयएएस पत्नी सूर्याने नऊ महिन्यांपूर्वी पतीला सोडलं होतं आणि ती गँगस्टरसोबत रिलेशनशीपमध्ये होते. गेल्या आठ महिन्यांपासून ती गुजरातमध्ये नव्हती.

 

 

इकडे आयएएसने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर जेव्हा सूर्या सासरी परतली तेव्हा तिला घरात येण्यासही नकार देण्यात आला.

 

 

त्यानंतर तिने पतीच्या घराबाहेरच विषप्राशण केलं. त्यानंतर तिला गांधीनगर येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

 

सूर्याच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. विषप्राशण करण्यापूर्वी सूर्याने एक पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये तिने तामिळनाडूत तिच्यासोबत झालेल्या दगाबाजीबाबत लिहिलं होतं.

 

 

तिला आयुष्याची नवी सुरुवात करायची होती, पण तिचे पैसे कुठेतरी फसले होते, जे परत येण्याची शक्यता नव्हती. ती तिच्या

 

आयएएस पतीकडेही परत जाऊ शकत नव्हती. सूर्याने सुसाइड नोटमध्ये आपल्या पतीवर कुठलाही आरोप केलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आयएएस रंजित कुमार २००५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नीने शनिवारी विषप्राशण करत आत्महत्या केली.

 

 

आयएएस रंजित कुमार हे गुजरातच्या विद्युत नियामक आयोग येथे सचिव पदावर कार्यरत आहेत. या पती-पत्नीमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून वाद सुरु होता.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *