अजितदादांच्या घरी सून येणार ,जय पवारांचा आज साखरपुडा

Daughter-in-law will come to Ajit's house, Jay Pawar's engagement ceremony today

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा आज पुण्यात (10 एप्रिल) साखरपुडा पार पडतोय. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय अजित पवार यांचा आज साखरपुडा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपुर्ण पवार कुटुंब एकत्र असणार आहे.

 

जय पवार यांचा साखरपुडा ऋतुजा पाटील यांच्या सोबत होणार आहे. या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतील, अशी माहिती समोर येत आहे.

साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटीलसह मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं.

 

जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने, या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी 13 मार्चला शरद पवार यांची भेट घेतली.

 

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली. पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटूंबात सुनबाईचे आगमन होणार असून जय पवार विवाहबंधनात अडकणार असल्याची गुड न्यूज खासदार सुप्रिया सुळेंनी दिली.

 

 

ऋतुजा पाटील पवार घराण्याची सुनबाई होणार असल्याची बातमी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना पार्थ पवार आणि जय पवार अशी दोन मुलं आहेत.

 

जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *