अजित दादांचे भुजबळांना राष्ट्रवादीचा राजीनामा देण्याचे आदेश ?
Ajit Dada orders Bhujbal to resign from NCP

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून पक्षश्रेष्ठींनी राजीनामा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षश्रेष्ठींनी समीर भुजबळ यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद आणि सदस्यत्वचा राजीनामा मागितला आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
असं असताना आता अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी समीर भुजबळ यांच्याकडे राजीनामा मागितल्याची माहिती आहे. समीर भुजबळ हे मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत.
त्यामुळे समीर भुजबळ यांनी शरद पवार गटात प्रवेश करुन नांदगावमधून निवडणूक लढवली तर नाशिकच्या राजकारणात काका-पुतणे यांच्यातच राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे.
समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी काही दिवसांपासून नांदगावमध्ये कामालादेखील सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्याबाबात सूचक वक्तव्य केलं होतं. “समीर, पंकज आता तुम्ही मोठे झालात.
तुमचे निर्णय स्वत: घ्यायला शिका”, असा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना उघडपणे दिला होता. त्यांच्या या सल्ल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.
याआधी आमदार पंकज भुजबळ हे नांदगावमध्ये उमेदवारीसाठी तयारी करत असल्याची चर्चा होती. पण त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.
यानंतर समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती.
पण नांदगाव मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेच्या वाटेला जातो. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे नांदगावचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीकडून सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित आहे.
महायुतीत एकाच मतदारसंघातून दोन उमेदवार दिले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महायुतीमधील अजित पवार गटाचे आमदार समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळणं कठीण आहे.
त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करुन उमेदवारी मिळवणार असल्याची चर्चा होती. समीर भुजबळ हे नांदगावमध्ये प्रचंड सक्रीय झाले असून ते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा आहे.
या सर्व चर्चांनंतर आता अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी समीर भुजबळ यांचा पक्षाच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजपा वगळता इतर पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली नसल्याने उत्सुकता शिगेला असताना,
दुसरीकडे नाराज असणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळेच अनेकजण पक्षांतर करण्याच्या तयारीत असताना यामध्ये समीर भुजबळ यांचाही समावेश आहे.
समीर भुजबळ महाविकास आघाडीत प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतून मोठी घडामोड समोर येत आहे. अजित पवार यांनी प्रदेशाध्य़क्ष सुनील तटकरे यांना समीर भुजबळांचा राजीनामा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना समीर भुजबळ यांचा राजीनामा घेण्याची सूचना केली आहे. अजित पवारांनी समीर भुजबळ यांना मुंबई अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या सूचना केल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ) मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता आहे.
समीर भुजबळ यांनी आधीच आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. पण महायुतीकडून संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं समजत आहे.
समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदे गट ही जागा भुजबळांसाठी सोडण्याची शक्यता कमीच आहेत.
अशा स्थितीत समीर भुजबळांसमोर अपक्ष लढण्याचा किंवा महाविकास आघाडीत प्रवेश कऱणं हे दोन पर्याय आहेत. सध्याच्या शक्यतांनुसार महायुतीकडून सुहास कांदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे समीर भुजबळांनी अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा पर्याय निवडला तर त्यांच्यासमोर सुहास कांदेंचं आव्हान असू शकतं.