अजित दादांनी दिला दिग्गज नेत्यांना धक्का ;‘हे’ नेते शपथ घेणार

Ajit Dada gives a shock to veteran leaders; 'These' leaders will take oath

 

 

 

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. निकाल लागल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी आज मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. उद्यापासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे

 

. त्या पार्श्वभूमीवर आज नागपूर विधीमंडळात शपथविधीचा सोहळा पार पडत आहे. महायुतीच्या तीनही पक्षांनी संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वाट्याला १० मंत्रिपदे आल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. अजित पवारांचा शपथविधी आधीच झाला आहे.

 

त्यामुळे आज उर्वरित ९ आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. अजित पवार यांनीही भाजपाप्रमाणेच धक्कातंत्राचा वापर करत

 

काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम या जुन्या मंत्र्यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही.

 

या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील

 

दत्तामामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ

 

मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे
माणिकराव कोकाटे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *