आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाकडुन गणेश फेस्टीवलचे बक्षीस वितरण
Prize distribution of Ganesh Festival by A. Dr. Ratnakar Gutte Mitra Mandal

पूर्णा/ शेख तौफिक
शहरातील गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत डिजे न वापरता पारंपरिक पद्धतीने तसेच देखाव्यांच्या माध्यमातून गणेश भक्तांचे प्रबोधन करतात.
त्यांचे हे कार्य उल्लेखनीय कौतुकास्पद असल्याचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, आ.राजेश विटेकर यांनी सांगितले .पूर्णा शहरात रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने
मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या गणेश उत्सवात स्थानिक सजावट, तसेच मिरवणुकीतील उत्कृष्ट देखावे याकरिता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री श्री गणेश फेस्टिवल स्पर्धेचा पारितोषक वितरण सोहळा पार पडला यावेळी आ.डॉ.गुट्टे, व आ.विटेकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विजयसिंह ठाकुर, ताडकळस बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार, लक्ष्मीकांत कदम, हनुमान अग्रवाल,
प्रशांत कापसे,छगनराव मोरे, अॅड.विशाल किरडे, सुनील डूब्बेवार, मोकिंद भोळे,संतोष सातपुते,माजी सरपंच ढोणे,अजय ठाकूर ,विशाल चितलांगे,सुभाष ओझा,किशोर सुर्यवंशी,माऊली कदम आदींची प्रमुख उपस्थित होती.
स्थानिक देखाव्यात त्रिशूळ गणेश मंडळाने प्रथम,श्री शिवाजी गणेश मंडळाने द्वितीय तर श्री एकता गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषक श्री अष्टविनायक गणेश मंडळाला मिळाले.
विसर्जन मिरवणुकीतील सामाजिक देखाव्यासाठी प्रथम पारितोषक महर्षी वाल्मिकी गणेश मंडळ,द्वितीय श्रीदत्त गणेश मंडळ तर तृतीय पारितोषक सुवर्णकार गणेश मंडळाने पटकावले.
धार्मिक देखाव्यासाठीचे प्रथम तसेच उत्कृष्ट गणेश मूर्ती साठी महावीर गणेश मंडळाला पारितोषक मिळाले.द्वितीय पारीतोषक श्री ओम गणेश मंडळाला,
तृतीय पारितोषक श्री अष्टविनायक गणेश मंडळाला मिळाले. शांतता पुरस्कार श्री स्वस्तिक गणेश मंडळाला मिळाला.गणेशोत्सवात सहभागी झालेल्या सर्व मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषक देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम यांनी तर सूत्र संचालन मूंजाजी कदम यांनी केले.विश्वनाथ होळकर, अॅड.गोविंद ठाकूर,अंकित कदम, श्रीनिवास कदम, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.









