एकही जागा नाही पण राज ठाकरे महायुतीत ;काय मिळणार भाजपकडून ?

There is no seat but Raj Thackeray in grand alliance; what will BJP get?

 

 

 

 

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये युती आणि लोकसभा निवडणुकीबद्दल ४० मिनिटं चर्चा झाली.

 

 

 

 

यानंतर राज मुंबईत परतले. मग मुंबईत बैठकांचा सिलसिला सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये भेट घेतली.

 

 

 

 

महायुतीमधील जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजप ३० पेक्षा अधिक जागांवर लढण्यास आग्रही आहे. शिंदेंची शिवसेना १६ ते १७ जागांवर लढण्यास उत्सुक आहे.

 

 

 

 

तर राष्ट्रवादीनं ७ जागांचा आग्रह धरला आहे. त्यातच रासपचे महादेव जानकर महायुतीत परतले आहेत. त्यांच्यासाठी एक जागा सोडण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत मनसेला लोकसभेची जागा देणं भाजपला अवघड जाऊ शकतं.

 

 

 

 

लोकसभेच्या जागावाटपात मनसेला वाटा देणं कठीण असल्यानं भाजपनं राज ठाकरेंना नवा प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. राज यांचे विश्वासू सहकारी आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांना राज्यसभेची जागा दिली जाऊ शकते.

 

 

 

 

नांदगावकर शिवडीचे आमदार राहिले आहेत. त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव राज यांना दिला जाऊ शकतो. याबद्दलचं वृत्त आहे.

 

 

 

 

राज्यसभा आणि विधान परिषदेची प्रत्येकी एक जागा मनसेला दिली जाऊ शकते. नांदगावकर यांना राज्यसभा आणि राज यांचे चिरंजीव अमित ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेची आमदारकी देण्याचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो.

 

 

 

 

महाराष्ट्रातील राज्यसभेची एक जागा लवकरच रिक्त होईल. केंद्रीय मंत्री पियूष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.

 

 

 

 

त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. गोयल लोकसभेवर गेल्यास राज्यसभेची जागा रिक्त होईल. त्यांच्या जागी भाजप नांदगावकर यांना संधी देऊ शकतो.

 

 

 

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. मनसे शिवसेनेत विलीन करा आणि पक्षाची धुरा तुमच्या खांद्यावर घ्या,

 

 

 

 

असा प्रस्ताव भाजपकडून राज यांना देण्यात आला. तुम्हीच बाळासाहेबांच्या हिंदुत्त्ववादी विचारांचे खरे वारसदार आहात. त्यामुळे शिवसेनेचं नेतृत्त्व तुम्हीच करा, असा प्रस्ताव भाजपकडून राज यांना देण्यात आला आहे.

 

 

 

 

दिल्लीत झालेल्या भेटीत शहांनी राज यांच्यासोबत व्यापक युतीसंदर्भात चर्चा केली. लोकसभा निवडणूक आणि जागावाटप यांच्यापलीकडे दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

 

 

 

राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या विषयांवर दिल्लीभेटीत सविस्तर चर्चा झाल्याचं वृत्त ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

 

 

‘भाजप राज ठाकरेंकडे दीर्घकाळचा सहकारी म्हणून पाहत आहे. याचा फोटो दोन्ही पक्षांना होईल. शिंदेंच्या शिवसेनेत मनसे विलीन करा आणि सेनेचे प्रमुख व्हा, असा प्रस्ताव राज यांना भाजपकडून देण्यात आला.

 

 

 

 

या निर्णयाचा मोठा राजकीय फायदा तुम्हाला होईल, असं भाजपकडून राज यांना सांगण्यात आलं,’ अशी माहिती सुत्रांनी दिली.

 

 

 

राज यांनी लोकसभेच्या ४८ जागांवर एनडीएचा प्रचार करावा. त्याच्या बदल्यात विधानसभेत त्यांनी सन्मानजनक जागा आणि सत्तेत वाटा देण्यात येईल, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला आहे.

 

 

भाजपनं त्यांच्या योजनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली आहे. पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी यांना योजनेची कल्पना द्या. त्यांच्यात सहमती घडवून आणा, अशी सूचना करण्यात आली आहे. ‘

 

 

 

 

शिंदे शिवसेनेचं नेतृत्त्व राज यांच्याकडे सोपवण्यास अनुत्सुक आहेत. यामुळे राजकीय कारकीर्द संपून जाईल अशी भीती त्यांच्या मनात आहे. पण भाजप आपल्या प्रस्तावावर ठाम आहे.

 

 

 

 

 

लोकसभेचा निकाल काहीही लागला तरी तुम्हाला मुख्यमंत्रिपदावरुन कायम ठेवलं जाईल, असा शब्द शिंदेंना भाजपकडून देण्यात आला आहे,’ अशी माहिती सुत्रांनी दिली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *