काँग्रेसचा मोठा नेता निवडणुकीत मुलाला पाडण्यासाठी करतोय जीवापाड प्रयत्न
A big leader of Congress is making desperate efforts to defeat his son in the election
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये कुटुंबातील सदस्यच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. केरळातही अशीच स्थिती असून,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. अँटनी यांनी मुलाच्या विरोधात रणशिंग फुंकले असून, त्यांच्या पराभवासाठी मैदानात उतरले आहेत.
अनिल अँटनी यांनी वर्षभरापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली आहे. दक्षिण केरळ लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार अँटो अँटनी आहेत.
मुलाच्या उमेदवारीवर बोलताना ए. के. अँटनी म्हणाले, मुलाचा पराभव व्हायला हवा. काँग्रेसचे उमेदवार अँटो अँटनी यांचा विजय होईल.
भाजपमध्ये प्रवेश करण्याची मुलाची कृती अत्यंत चुकीची होती. काँग्रेस हा माझा धर्म आहे, असे सांगत त्यांनी मुलाच्या राजकारणाबाबत बोलण्यास नकार दिला.
काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसविरोधात लढा देत आहेत. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी काँग्रेसवर केलेले आरोप येथील जनता गांभीर्याने घेईल,
असे मला वाटत नाही, असेही अँटनी यांनी स्पष्ट केले. विजयन यांनी मुस्लिम आणि हिंदूंच्या मतांसाठी काँग्रेसकडून सीएएबाबत भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप केला होता.
इंडिया आघाडी दरदिवशी पुढे जात असून, भाजप मागे पडत चालले आहे. सरकार स्थापन करण्याची ही चांगली संधी असल्याचेही अँटनी म्हणाले.
दरम्यान, अँटनी यांनी यापूर्वी मुलाच्या भाजप प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते नेहमीच भाजपविरोधात उभे ठाकले आहे. गांधी कुटुंबाचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.