काँग्रेसच्या आरोपावर अण्णा हजारे म्हणाले ….. तर देशात आग लागणार !
Anna Hazare said on the allegation of Congress ..... then the country will be on fire!

राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.
सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. अण्णा हजारे यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि विरोधकांकडून होत असलेल्या आरोपावर अण्णा हजारे यांनी उत्तर दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना
अण्णा हजारे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र भाजपवर असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. यावर अण्णा हजारे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही सरकारने किंवा पक्षाने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देश पेटेल. आपले संविधान परिपूर्ण आहे. ते बदलण्याची गरज आहे का?
भारताचे संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. त्यात कोणीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, असे अण्णा हजारे यांनी स्पष्टच सांगितले.
देश मजबूत करायचा असेल तर मतदान केले पाहिजे, चारित्र्यवानांच्या हातात देश देण्याची गरज आहे. अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.
केजरीवाल मद्याच्या नशेतून आलेल्या पैशांच्या नशेत बुडाले आहेत. मी अरविंदला अनेक वेळा सांगितले, चारित्र सांभाळा, विचार शुद्ध ठेवा. परंतु मद्याचा पैसा मिळताच त्यात केजरीवाल तुडंब बुडाले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांनी पुन्हा एकदा महायुती म्हणजेच एनडीएकडून निवडणूक लढवली आहे.
त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना लोकसभेचे उमेदवार करण्यात आले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या लोकसभेच्या जागेकडे लागले आहे.