केंद्रात मंत्रिपदावरून राष्ट्रवादीच्या दोन नेत्यामध्ये घमासान ?

Clash between two NCP leaders over ministerial posts at the Centre ?

 

 

 

 

 

एनडीए सरकारचे पंतप्रधान म्हणून आज मोदींचा सायंकाळी शपथविधी होत आहे . या सरकारला पाठिंबा देणाऱ्या विविध घटक दलांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे .

 

 

 

परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकालाही शपथविधीसाठी फोन आलेला नाही त्यामुळे राज्यभर त्याची चर्चा होत आहे,मंत्रिपद न मिळण्याचे कारण

 

 

 

अजित पवारांकडे फक्त एक खासदार असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीमध्ये मंत्रपदावरून अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

संदर्भात आतल्या गोटातिल बातमी समोर येत आहे याबाबत माहिती अशी की अजित पवार गटामध्ये मंत्रीपदावरून वाद निर्माण झालेले आहे

 

 

 

वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी मोठ्या प्रमाणात वाद विकोपाला गेलेला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

 

 

 

दोघांनीही मंत्रीपदासाठी दावा केलेला आहे, कोणाचे नाव द्यावे यावरून अजित पवार सध्या टेन्शनमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

भाजपने त्यांना तुम्ही याबाबत आपसात ठरून आम्हाला एक नाव द्या असे सुचविले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांनी मंत्रपदावर दावा केल्यामुळे मंत्रिपद कोणाला द्यावे हा मोठा प्रश्न अजित पवारासमोर आहे.

 

 

 

भाजपने राज्यमंत्री पदासाठी एक नाव ठरवून आम्हाला द्या असा निरोप दिला ,एनडीए सरकार स्थापन होणार असल्याच्या बातम्या सुरु झाल्यापासूनच

 

 

 

 

राष्ट्र्वादीतर्फे प्रफुल पटेल याना मंत्रिपद मिळणार असल्याच्या बातम्या माध्यमामध्ये पेरण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे . यावरून राष्ट्रवादीमध्ये घमासान सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

परंतु प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातील वादामुळे सध्या तरी अजित पवार कोणाचेही नाव देऊ शकले नाही . सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे एकमेव खासदार हे विजय झालेले आहेत

 

 

 

 

त्यामुळे सुनील तटकरे यांची मागणी अशी आहे की त्यांनाच मंत्रीपद मिळालेला पाहिजे. तर प्रफुल पटेल हे सहा वेळा राज्यसभा गेलेले आहेत यामुळे त्यांचा दावा आहे की मंत्रीपद आपल्यालाच मिळाले पाहिजे.

 

 

 

 

राष्ट्र्वादीतील हे दोघेही दिग्गज आपल्या दाव्यावर ठाम असल्यामुळे राष्ट्र्वादीत पेच निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही ठाम असून कोणीही मागे हटण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते .

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *