डोनाल्ड ट्रम्प यांच्या “या “निर्णयामुळे अमेरिकेत गर्भवती महिलांच्या रुग्णालयात लागल्या रांगा

Donald Trump's "decision" has caused queues of pregnant women at hospitals in America

 

 

 

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथ घेतली आहे. त्यांनी आपल्या शपथविधीनंतर तात्काळ काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत जन्माधारीत नागरिकत्व देण्याबाबतच्या घेतलेल्या निर्णयाने गर्भवती महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

आता गर्भवती महिलांनी मॅटर्निटी होममध्ये रांगा लावल्या आहेत. या महिलांना त्यांच्या बाळांची वेळेच्या आधी म्हणजे २० फेब्रुवारीच्या आधी डिलिव्हरी करायची आहे. अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणानुसार हा कायदा रद्द करण्यास वयस्क अमेरिकन नागरिकांनी विरोध केला आहे.

 

आमच्याकडे वेळेआधीच आपली प्रसुती करावी अशी विनंती करणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या वाढत चालली आहे. या बहुमतांशी भारतीय महिलांचा समावेश आहे.

 

त्यांना त्यांची प्रसुती ८ व्या किंवा ९ व्या महिन्यात करायची आहे. या सर्व महिलांना २० फेब्रुवारीच्या आधी आपल्या बाळाचा जगात प्रवेश करायचा आहे.

 

यात काही महिला अशा आहेत ज्यांच्या नियमित डिलीव्हरीला अजून एक महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे असे न्यु जर्सीच्या एका डॉक्टरने सांगिलते आहे.

 

सात महीन्यांची गर्भवती महिला आपल्या पतीसोबत आली होती आणि प्री टर्म डिलिव्हरी करायची आहे. तिची डिलिव्हरी मार्चसाठी ड्यू आहे. वास्तविक २० फेब्रुवारीनंतर परकीय नागरिकांचे मुल जरी अमेरिकेत जन्माला आले

 

तरी त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. या आधीच्या निर्णयाप्रमाणे अमेरिकेचे नागरिक नसलेल्या किंवा ग्रीनकार्ड धारक नसलेल्या पालकांना त्यांच्या मुलाचा जन्म जरी अमेरिकेत झाला तर आपोआप नागरिकत्व मिळत होते.

 

मी दाम्पत्यांना विनंती करते की जरी वेळेआधी प्रसुती शक्य असली तर यात मुलाला धोका असतो. त्यात अनेक अडचणी असून अविकसित फुप्फुसे, कमी वजन, न्युरोलॉजिकल समस्यांसह त्रास होऊ शकतात

 

असे टेक्सासच्या एक डॉक्टर एसजी मुक्कल यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की गेल्याकाही दिवसात त्यांनी १५ ते २० जोडप्यांशी या विषयावर चर्चा केली आहे.

 

आम्ही ग्रीन कार्ड्ससाठी सहा वर्षे वाट पाहात आहोत. आमच्या कुटुंबाला स्थिरता मिळविण्याचा हाच एक पर्याय होता. आम्हाला अनिश्चितेने मानसिक त्रास होत आहे

 

असे मार्चमध्ये बाळाचा जन्म देण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. आठ वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहचलेल्या एका व्यक्तीने सांगितले की मी आणि माझी पत्नी ट्रम्प यांच्या या निर्णयाने खूप दु:खी आहोत.

 

आम्ही विचार केला होता की आम्ही आता शरणार्थी बनणार आहोत. परंतू माझी पत्नी गर्भवती होती आणि आमच्या वकीलांनी सांगितले की आम्ही आमच्या मुलाच्या जन्मामुळे आम्ही थेट अमेरिकेचे नागरीक बनणार आहोत असे अन्य एका नागरिकाने सांगितले.

 

अमेरिकेच्या २२ प्रांतांचे अटर्नी जनरल यांनी ट्रम्प यांच्या त्या शासकीय आदेशाविरोधात मंगळवारी खटला दाखल केला आहे. देशात जन्मलेल्या मुलाला थेट अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा

 

शंभर वर्षे जुना नियम रद्द करण्याचे पाऊल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उचलले आहे. या नियमानुसार कोणा व्यक्तीचा जन्म जर अमेरिकेत झाला तर

 

जन्माआधारे त्याला अमेरिकेचे थेट नागरिकत्व मिळत होते. जरी त्याचे आई-वडील दुसऱ्या देशाचे असतील तरी त्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *