तीन हजाराची लाच घेतांना शिपाईला रंगेहात अटक
A soldier was arrested red-handed while accepting a bribe of Rs

वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीची फेर मोजणी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडत ताब्यात घेण्यात आले आहे.
सावखेडा (ता. शहादा) येथील विनोद बाळू शिंदे (वय ४२) असे लाच घेणाऱ्या शिपायाचे नाव आहे. तक्रारदाराची वडिलोपार्जित शेत जमिन असून
या जमिनीची ४ ऑक्टोंबर २०२३ ला भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव तक्रारदार
यांना सदरची जमिनीची पुन्हा फेर मोजणी करावयाची असल्याने यासाठीच्या अर्जासह तक्रारदार भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते.
यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका, मी तुमची जमीन शेतात येऊन मोजणी करून देतो.
त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला तीन हजार रुपये देऊन द्या असे सांगून लाचेची मागणी केली. १६ मार्चला शिपाई शिंदे यास तीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
हि कारवाई नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी,
पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, हेमंत महाले, सुभाष पावरा आदींनी कारवाई केली.