धक्कादायक घटना ;संतप्त मतदाराने थेट ईव्हीएम मशीनच पेटवले
Shocking incident: An angry voter directly set the EVM machine on fire

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात खळबळजनक घटना घडली आहे. संतापलेल्या मतदाराने मतदान करण्याऐवजी थेट ईव्हीएम मशीनला आग लावली.
मतदान केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या आगीची घटना लक्षात येताच ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवली.
बंदोबस्तसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी ईव्हीएम मशीन पेटवणाऱ्या मतदाराला ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जातीने लक्ष घालत ईव्हीएम मशीनची तपासणी केली. पेटवलेल्या ईव्हीएम मशीनमधील डेटा सुरक्षित आहे,
मत मोजणीच्या वेळी अर्धवट जळालेली ईव्हीएम मशिनमधील मतदानाची मोजणी करण्यात येईल अशी अधिकृत माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सांगोला विधानसभा मतदारसंघात असलेल्या भागलवाडी येथील मतदान केंद्रावर तरुणाने चक्क ईव्हीएम मशीनला आग लावली. ईव्हीएम मशीनने पेट घेतल्याचे लक्षात येताच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.
पिण्याच्या पाण्यासाठी ठेवण्यात आलेल्या डब्यातील सर्व पाणी ईव्हीएम मशीनवर टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचताच ईव्हीएम मशीन बदलून अर्धवट जळालेली ईव्हीएम मशीन ताब्यात घेऊन अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील भागलवाडी येथील।मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होते.दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएम मशीनला तरुणाने पेटविले.
अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एकच भीती होती,सकाळी सात वाजल्यापासून जे कुणी मतदान केले,ते देखील नष्ट झाले की काय?मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी
माहिती देताना सांगितले,मशीन अर्धवट जळालेली आहे,त्यामध्ये झालेला मतदान सुरक्षित आहे.मत मोजणी वेळी अर्धवट जळालेल्या मशीन मधील मतदानाची मोजणी करण्यात येईल.