निवडणुकीतून माघार घेण्याच्या मनोज जरांगेंच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया!

Sharad Pawar's reaction to Manoj Jarang's decision to withdraw from the election!

 

 

 

 

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. ते राज्यातील विविध मतदारसंघातून उमेदवार उभे करणार आहेत. ठरलेल्या मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारांनी अर्जही भरले होते.

 

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटची तारीख असल्याने त्यांनी सर्वच उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगेंनी हा चांगला निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया

 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. आज महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

 

 

एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही.

 

मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते,

 

असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. महाविकास आघाडीचा दबाव होता म्हणून मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली. या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

शरद पवार म्हणाले, “या महाविकास आघाडीचा कोणाशीही काही संबंध नाही. हा निर्णय मनोज जरांगेंचा आहे. पूर्वीचा निर्णयही (निवडणूक लढवण्याचा) त्यांचा होता.

 

मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचं एकच कारण आहे. ते सतत सांगत आहेत भाजपाला आमचा विरोध आहे. ते भाजपाविरोधात खेळले असते तर त्याचा फायदा भाजपालाच झाला असता. त्यादृष्टीने त्यांचा निर्णय योग्य आहे.”

 

“एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही.

 

मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते”, असंही जरांगे यांनी सांगितलं.

 

“महायुती आणि महाविकास आघाडी कुणाचाही दबाव नाही. कुणीही दबाव टाकला तर मी त्याच्या घरी जाऊन डोक्यात दगड घालेन असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

 

तसंच मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही. मी बदलत नाही, बदलणार नाही. आम्ही तीन ते चार महिने अभ्यास केला होता.

 

महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहे. मी मनोज जरांगे एकटा नाही. तर मी म्हणजे आमचा पूर्ण समाज आहे”, असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *