परभणी जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु;बँकेतून २६ हजार लांबवले

There is a wave of thieves in Parbhani district; 26 thousand were withdrawn from the bank

 

 

 

परभणी जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत चोरटयांनी बँकेत गहाण ठेवलेले दागिने पैसे भरुन सोडवून घेण्यासाठी स्लीप भरत असताना एका जवळील २६ हजार रुपये अनोळखी चोरट्याने काढून घेतले.

 

ही घटना २० मे रोजी दुपारच्या सुमारास येथील एसबीआय बँकेत घडली. सदर प्रकरणी २२ मे ला जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शिवप्रसाद घुगे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे २० मे रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास अंबरवाडी येथून जिंतुरला आले.

 

एसबीआय बँकेत गहाण ठेवलेले दागिने पैसे भरुन सोडवून घेण्यासाठी बँकेमध्ये दुपारी तीनच्या सुमारास गेले. स्लीप भरत असताना त्यांनी पैशांची पिशवी दोन्ही पायाच्या मधात ठेवली होती.

 

काउंटरवर पैसे भरण्यासाठी गेल्यावर शिवप्रसाद घुगे यांना शंका आली. त्यांनी रोकडची पाहणी केली असता त्यांना २६ हजार रुपयांचे बंडल कमी दिसले. बँकेत इकडे तिकडे पाहणी केल्यावरही रोकड मिळून आली नाही.

हे हि वाचा BREAKING NEWS;मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोबाईल बाबत घेतला महत्वाचा निर्णय.

अज्ञात चोरट्याने रक्कम काढून घेतल्याचे पुढे आल्याने या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

दरम्यान कालच सेलू शहरातील शाहूनगर येथील म्हशीच्या गोठ्यात कपाटामध्ये ठेवलेले चार लाख ५५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले.

 

हि घटना २१ मे रोजी सकाळी सेलू येथील शाहुनगरात उघडकीस आली. या प्रकरणी २२ मे ला सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

 

गोकुळ डोळझापे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचा शाहु नगर येथे म्हशीचा गोठा आहे. या गोठ्यातील आलमारीत त्यांनी दुधाचे आलेले पैसे, म्हशीच व्यवहाराची रक्कम ठेवली होती.

हे हि वाचाpune Crime News;वैष्णवी हगवणे प्रकरणात काही बडे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

१९ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्यादी लग्नकार्यासाठी नाशिक येथे गेले. लग्न झाल्यानंतर २० मे ला रात्री परत आले. २१ मे रोजी सकाळी म्हशीच्या गोठ्यात असलेले कपाट उघडून पाहिले असता त्यांना कपाट ठेवलेले ४ लाख ५५ हजार रुपये दिसून आले नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *