पोलीस निरीक्षकाने केली भाजप आमदाराला शिवीगाळ
Police inspector abused BJP MLA

भाजप आमदाराला फोनवर शिव्या देणे पोलिस निरीक्षकाला चांगलंच भोवल्याचं समोर आलं. अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना एका पोलिस अधिकाऱ्याने फोनवर शिव्या दिल्या होत्या. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांची बदली मुख्यालयात केली.
गुरांच्या तस्करीवरून भाजप आमदार पिपंळे यांनी बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तूनकलवार यांना फोन केला. मात्र या वेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला अन पोलिस अधिकाऱ्याने आमदाराला फोनवर शिव्या दिल्या.
शिवीगाळीचा आरोप करीत भाजप आमदाराने शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची करा, अन्यथा राजकारणी आणि आमदारांची प्रतिष्ठा राहणार नाही अशी मागणी थेट गृहमंत्र्यांना ऑडिओ मॅसेजद्वारे केली.
या तक्रारीनंतर तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकारी तुनकलवार यांच्यावर अकोला पोलिस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे.
बार्शीटाकळी पोलिस ठाण्यातून त्यांची उचलबांगडी करत त्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवारांनी थेट आपल्याला फोनवर नशेत शिव्या दिल्याचा आरोप भाजप आमदार हरीश पिंपळे यांना केला होता.
महामार्गावरून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात आल्याचा आरोपही आमदारांनी केला होता.
त्यानंतर आमदार पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ऑडिओ क्लिप पाठवली. त्यामध्ये आपल्याला शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती.
आमदारासोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदार म्हणून इज्जत राहणार नाही अशा शब्दात गृहमंत्र्याकडे कळकळीची विनवणी केली होती.
आज गृहखातं आपल्याकडे आहे, अशा शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाईची मागणी त्यांनी गृहम़ंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. कारवाई झाली नाही तर राजकारणात आमदारांची यापुढे प्रतिष्ठा राहणार नाही.
त्यामुळे अशा ठाणेदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा आमदारांनी गृहमंत्र्यांसह राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून व्यक्त केली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवारांवर बदलीची कारवाई झाली. अकोल्याच्या पोलिस कंट्रोल रूममध्ये त्यांना अटॅच करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचा प्रभार सध्या सहायक पोलिस निरीक्षक दिपक वारे यांच्याकडे देण्यात आला आहे.
आमदारांच्या तक्रारीनंतर थेट गृहमंत्र्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस निरिक्षक तुनकलवार यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेत. यानंतर अकोला पोलिस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे.
बार्शीटाकळी पोलिस ठाण्यातून त्यांची उचलबांगडी करीत त्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस अधिक्षक अनमोल मित्तल करणार आहेत.