बापरे…महाराष्ट्रात पोलिसांच्या हाती लागले टेम्पोभरून सोने
Bapare... In Maharashtra, the police got the gold from Tempo

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर
भागातून तब्बल १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने कोठे नेण्यात येत होते. यादृष्टीने तपास सुरू आहे.
नाकाबंदीत सहकारनगर पोलिसांनी शुक्रवारी १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. याबाबतची माहिती निवडणूक अधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आली आहे,
अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दिवसा आणि रात्रीही संशयित वाहनांची नाकाबंदी करण्यात येत आहे. सहकारनगर भागात शुक्रवारी सकाळी एका टेम्पो चालकाला नाकाबंदीत पोलिसांनी अडवले.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात मोठ्या प्रमाणावर साेने असल्याचे आढळून आले. नाकाबंदीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी सोने,
तसेट टेम्पो जप्त केले आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने कोठून आणले, तसेच ते कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. टेम्पो एका वाहतूकदाराचा असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात ग्रामीण पोलिसांनी एका मोटारीतून पाच कोटी रुपयांची जप्त केली होती. मावळ तालुक्यात पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असून भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी एक गाडी अडवली असता,
त्यात कोट्यवींची रोकड सापडली होती. निवडणुकांच्या कामासाठीच ही रोकड पाठविण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी या रोकडचे वाहन पाहून केला होता.
त्यानंतर, आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. याबाबत, आता पुढील तपासणी सुरू असून पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता,
त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला असून तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टेम्पोमध्ये आढळून आलं आहे. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून
यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.
पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो सध्या आणलेला आहे. याबाबत, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पोलिसांकडून सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व 24 तास तपासणी सुरू आहे. त्यानुसार, आज सकाळी तपासणी दरम्यान, आढळून आलेल्या टेम्पोची तपासणी करण्यात आली आहे.
त्यामध्ये, पांढरे बॉक्स होते, या बॉक्समध्ये काहीतरी असल्याचे लक्षात येताच चालकाकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये दागिने असून मुंबईतून ते पुण्याच्या कार्यालयात आणले गेले आहेत.
त्यामुळे, आपण आयकर विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पुढील चौकशीसाठी त्यांनाही बोलवले आहे, अशी माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली.