भाजप खासदार काँग्रेसच्या वाटेवर ,भाजपचा दिला राजीनामा
BJP MP resigned from BJP on the way to Congress
हिसारमधील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भातील
माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलंय की, राजकीय कारणासाठी भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
ब्रिजेंद्र सिंह आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, ‘पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मला हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’
ब्रिजेंद्र सिंह गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिजेंद्र सिंह हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह आणि भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह हे दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
त्यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हरियाणात लोकसभेच्या १० जागा आहेत. भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवला होता.
ब्रिजेंद्र सिंह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३,१४, ०६८ मतांनी विजय झाले होते. ते केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांचे पुत्र आहेत.
तसेच त्यांनी आएएसची नोकरी सोडून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांचे वडील बिरेंद्र सिंह २०२२ पर्यंत राज्यसभा खासदार होते. ते पाचवेळा उचाना मतदारसंघातून आमदार होते. तसेच हरियाणा सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत.
ब्रिजेंद्र सिंह यांना भाजपमध्ये आपले भविष्य दिसत नव्हते. त्यांना यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची शक्यता वाटत नव्हती. २०१९ मध्ये त्यांनी जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांचा पराभव केला होता.
जेजेपी सध्या भाजपसोबत युतीमध्ये आहे. तसेच कुलदीप बिश्नोई भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना तिकीट न मिळणे जवळपास नक्की होतं. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचं ठरल्याचं कळतंय.
https://twitter.com/BrijendraSpeaks/status/1766706322727117222?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1766706322727117222%7Ctwgr%5Ec5baefac4591a9c1fb6e9315a235b1678eb61723%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fbrijendra-singh-hisar-mp-resigns-from-bjp-likely-to-join-congress-with-father-birender-singh-lok-sabha-elections-knp94