भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा दसरा सण
Dussehra is an important festival in Indian culture.

विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा मानला जातो. दसरा म्हणजे संपन्नतेचा सन, दसरा म्हणजे सिमोल्लंघनाचा सन दसऱ्याच्या वेळी सिमोल्लंघन साजरा केला जातो
आणि प्राचीन काळात त्याचे खुप महत्व होते, सिमा म्हणजे मर्यादा आणि लंघन म्हणजे ओलांडणे. विजयादशमी दरम्यान सिमोल्लंघन विधी महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्ये प्रसिद्ध आहे.
आपण आपल्या सोयीनुसार बऱ्याच गोष्टींचा अर्थ लावत असतो. म्हणजे ते आता प्रातिनिधीक स्वरुपात राहिले आहे. काहिंच्या मते पुर्वी एका विशिष्ट क्षेत्रापर्यंत मर्यादित असलेल्या गावकऱ्यांना अडथळे तोडून इतर कालावधीत मर्यादेबाहेर असलेल्या गावांना भेट देण्याची परवानगी होती.
तर काहिंच्या मते भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतातली बहुतेक सनंवारं ही शेती निगडित आहेत. प्रारंभी हा एक कृषीविषयक लोकउत्सव होता. पेरलेले शेतीतील पहिले पिक यावेळी घरात येत असे
त्यावेळी शेतकरी उत्सव करत असे ग्रामीण भागात शेतीतील धान्याचा तुरा आपल्या फेट्याला लावण्याची पद्धतही प्रचलित आहे. काही लोक ते काणावर खोचतात तर काही लोक टोपीवर लावतात.
काहींचे तर असेही म्हणने आहे की, शेतीची वगैरे बरीचशी कामे आटोपलेली असतात त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर जाणे सहज शक्य असते,म्हणून गावाच्या सीमा ओलांडून जाणे हे सीमोल्लंघन व्यवहारात मानले जाते.
परंतु हा एक अर्थ झाला. माणसाने त्याच्या सोयीसाठी केला असावा.
पुर्वी याच दिवशी शिक्षणाचा प्रारंभ केला जात असे. आता याच दिवशी संगणकाची पुजा केली जाते. दसरा हा सिमोल्लंघनाचा दिवस मानला जातो प्रत्येक माणसाला केवळ दुसऱ्याच्याच दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही सिमोल्लंघन करावे लागते. प्राथमिक शाळेतून माध्यमीक शाळेत,
माध्यमीक शाळेतून कॉलेजमध्ये, कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर नोकरीकडे किंवा व्यवसायाकडे काहींना तर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आपल्या देशातुन परदेशात सिमोल्लंघन करावे लागते.
कोरोना मुळे थांबलेली लोकं यंदा मात्र सिमोल्लंघना साठी सज्ज होताना दिसतायेत २ वर्ष नियमांच्या सिमे मध्ये राहून कंटाळलेली लोकं #revange_tourism च्या नावाखाली वाटेल तसं बॅग भरून गावा बाहेरचा रस्ता पकडतांना
बघायला मिळतायेत. तिसरी लाट येयील की नाही ह्यात शंका आहे पण यंदा सिमोल्लंघनाची लाट मात्र नक्कीच येणार ह्यात काही शंका नाही….!
प्रा. विलास राठोड (पर्यटन विभाग, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई)




प्रा. विलास राठोड (पर्यटन विभाग, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई)



