भारत- पाकिस्तान तणावात आता अमेरिकेची इंट्री

America's entry into India-Pakistan tension

 

 

 

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतानं सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर

 

आता भारताचं पुढचं पाऊल काय असणार यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. आता या प्रकरणात अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसोबत संवाद साधला आहे.

 

या प्रकरणावर चर्चेतून तोडगा काढवा अशी मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॉम ब्रूस यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

 

अमेरिका भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या संदर्भात मला नोट्स देखील दिल्या आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या स्थितीसंदर्भात आमचं भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी बोलणं सुरू आहे.

 

भारत आणि पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे,असं अमेरिकेनं म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री लवकरच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत.

 

तसेच या प्रकरणावर इतर राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील भारत आणि पाकिस्तानशी बोलावं यासाठी देखील ते प्रयत्न करत आहेत.

 

अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॅम ब्रूस यांनी पुढे बोलताना म्हटलं की, लवकरच भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीसंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बोलतील.

 

आमचं प्रत्येक घडामोडीवर लक्ष आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तान सरकारच्या संपर्कात आहोत. सध्या भारत आणि पाकिस्तानकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे चर्चेतून तोडगा निघाला पाहिजे, असं ब्रूस यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोठं वक्तव्य केलं होतं. अमेरिकेनं तटस्थ भूमिका घेतल्याचं यातून दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आमच्यासाठी जवळचे आहेत. चर्चेतून मार्ग काढावा असं त्यांनी म्हटलं होतं.

 

 

दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असताना दुसरीकडे भारताचा सर्वात जवळचा मित्र असणाऱ्या रशियानं मोठं पाऊल उचललं आहे. रशियानं चीनला अत्याधुनिक ‘एस 400’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र पुरवले आहेत.

 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रशियानं चीनला जे क्षेपणास्त्र पुरवले आहेत त्यांचा समावेश हा जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांमध्ये होतो. कोणत्याही प्रकारचा हवेतील मारा हे क्षेपणास्त्र सहज थांबवू शकते.

 

चीनने 2014 मध्ये ‘एस 400’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी रशियासोबत अब्जआधी डॉलरचा करार केला होता. या कराराच्या तब्बल आकरा वर्षांनंतर रशियानं चीनला ही क्षेपणास्त्र दिली आहेत.

 

रशिया आणि चीनमध्ये झालेल्या या व्यवाहाराने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत केलं आहे. चीनला रशियाकडून ‘एस 400’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र मिळाल्यामुळे आता चीनची ताकत आणखी वाढणार आहे.

 

दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

 

पाकिस्तानी नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. आमच्याकडे असलेले अणू बॉम्ब हे काय शोभेची वस्तू नाही असं पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यानं म्हटलं आहे.

 

तर आमची सेना सज्ज असून आम्ही युद्धाला तयार असल्याचं त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं विखारी वक्तव्य सुरू आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *