मुंबईत मोदींच्या सभेत रिकाम्या खुर्च्या,आघाडी -युतीत आरोपांच्या फैरी

Empty chairs in Modi's meeting in Mumbai, round of accusations in Aghadi-Uti

 

 

 

मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मात्र या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलीय. विरोधकांनी रिकाम्या खूर्च्यांचे

 

फोटो ट्विट करून टीका केलीय. इतकंच नाही तर पैसे देऊन लोक जमा केल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.

 

मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. पंतप्रधानांच्या सभेवेळीचे रिकाम्या खुर्च्यांचे फोटो राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी ट्विट करून

 

टिकास्त्र डागलंय. आम्ही महाराष्ट्र गुजरातमधून चालवू देणार नाही, अशा शब्दांत जयंत पाटलांनी मोदींच्या सभेवर टीका केलीय. उद्धव ठाकरेंनीही

 

रिकाम्या खुर्च्यांवरून टीकास्त्र डागलंय. लोकांची नव्हे तर रिकाम्या खुर्च्यांची गर्दी जमा झाली होती, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय.

 

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनीही आपल्या स्टाईलमध्ये यावरून टोला लगावला. पंतप्रधान मोदींच्या सभेला 5 हजार माणसंही नव्हती असा दावा राऊतांनी केलाय.

 

 

पैसे देऊन माणसं जमवल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय.आदित्य ठाकरे यांनीही यावरून महायुती सरकारवर टीका केलीय.

 

ज्यांनी महाराष्ट्र रिकामा करण्याचा प्रयत्न केला त्यांना रिकाम्या खूर्च्या मिळाल्या अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय.

 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यापर्यंत आलाय. महायुती आणि मविआत आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगत आहे. आता रिकाम्या खूर्च्या हा पण आरोप-प्रत्यारोपांसाठी एक मुद्दा झालाय.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *