मोठा विमान अपघात टळला
Major Plane Crash Averted


चेन्नई विमानतळावर मोठा विमान अपघात थोडक्यात टळला आहे. विमान लँड झाल्यानंतर एका प्रवाशानं अचानक विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन करून विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रवाशाने विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन केल्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. हे विमान शारजाहावरून चेन्नईला आलं होतं.
एकनाथ शिंदे वाचाळवीर मंत्र्यांना देणार डच्चू ?
या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3:23 ला लँड झालं, विमान लँड झाल्यानंतर अवघ्या एक मिनिटानंतर या प्रवाशानं इमर्जन्सी गेट ओपन करून विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यानंतर विमानतळ प्रशासनाकडून तातडीने हा रन वे बंद करण्यात आला.
समोर आलेल्या माहितीनुसार मोहम्मद शरीफ मोहम्मद नजमुद्दीन असं या 29 वर्षीय प्रवाशाचं नाव आहे. त्याने विमान लँड झाल्यानंतर विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन करून टॅक्सी वे 5 वर उडी मारली.
ही घटना अंदाजे पहाटे 3:25 च्या सुमारास घडली. हे विमान 3:23 ला लँड झालं होतं, त्यानंतर अवघ्या एकच मिनिटामध्ये या प्रवाशाने विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन करून उडी मारल्याची माहिती समोर येत आहे.
“जगणं कठीण झालंय”म्हणत न्यायाधीशाची आत्महत्या
त्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे विमानाची धावपट्टी बंद करण्यात आली. रन वे बंद करण्यात आल्यामुळे त्याचा विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला. त्यामुळे याच दरम्यान बँकॉक आणि अबू धाबीला जाणाऱ्या विमानांनी धावपट्टी 12 वरून उड्डाणं केलं.
या घटनेसंदर्भात माहिती देताना एका एअर पोर्ट अधिकाऱ्याने सांगितले की ही घटना घडल्यानंतर विमानाला दुसरीकडे हलवण्यात आले. त्यानंतर पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ही धावपट्टी पुन्हा सुरू झाली.
राज्यावर दुहेरी संकट, 24 तासाचा मोठा इशारा
दरम्यान या घटनेमुळे काही काळ विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला. या धावपट्टीवरून उड्डाण करणारे विमान दुसऱ्या धावपट्टींवर वळवण्यात आले.
बँकॉक आणि अबू धाबीला जाणाऱ्या विमानांनी धावपट्टी 12 वरून उड्डाण केलं. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. या प्रवाशानं विमान लँड होताच अचानक इमर्जन्सी गेट ओपन केलं.









