शारदा महाविद्यालयात एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी
Sarada College S. R. Ranganathan Jayanti celebrated with enthusiasm

शारदा महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सौ. वैशाली देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून कानपूर येथील विकास प्रकाशनचे शैलेंद्र वाजपेयी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, डॉ. हनुमंत शेवाळे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी शैलेंद्र वाजपेयी, डॉ. संतोष नाकाडे यांनी एस. आर. रंगनाथन यांच्या जीवकार्याची सविस्तर ओळख करून दिली.
त्यानंतर अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. सौ. देशपांडे यांनी रंगनाथन यांच्या कार्याची ओळख करून देत विद्यार्थ्याना ग्रंथालयातील माहिती व्यवस्थित करून देण्यासाठी विशेष कार्यक्रम घ्यावा अशी सूचना केली .
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन खडके यांनी, प्रास्ताविक आयोजक डॉ. प्रशांत मेने यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रा. डॉ. काझी कलिमोद्दिन
, डॉ. अविनाश पांचाळ यांच्यासह प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ खेडकर, भगवान रिठाड, सुनंदा राजगुरू यांनी प्रयत्न केले.








