शिवसेना म्हणते अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंना शब्द? तर भाजप म्हणते…..
Shiv Sena says Shinde has a word about the Chief Minister's post for two and a half years? While BJP says.....

महायुतीला भरभक्कम बहुमत मिळूनही दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊ शकलेला नाही. शिवसेनेतील नेत्यांनी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे.
तर दुसरीकडे भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट संदेश दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नूर बदलला आहे.
निकालानंतर आक्रमक झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आता मवाळ झाले आहेत. यातच, एकनाथ शिंदेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं, अशीही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे.
२०१९ मध्ये तत्कालीन भाजपा-शिवसेने युतीमध्ये शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं, असा दावा करण्यात येत होता. परंतु, याबाबत चर्चाच झाली नसल्याची भूमिका भाजपाने घेतली होती.
त्यामुळे विश्वासघात केला असं सांगत उद्धव ठाकरेंनी युती तोडली होती. दिलेला शब्द मोडल्याचं सांगत उद्धव ठाकरे युतीतून बाहेर झाले होते. आताही तशीच चर्चा सुरू आहे.
जागा वाटपाच्या वेळी अडीच-अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पदाचे आश्वासन एकनाथ शिंदे यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु, या चर्चेवर रावसाहेब दानवे यांनी पूर्णविराम दिला आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, “तुमच्या नेतृत्त्वात निवडणुका लढतोय असं एकनाथ शिंदेंना सांगितलं होतं, यात काही शंका नाही. पण मुख्यमंत्री पदाबाबत कोणीच कोणाला शब्द दिला नव्हता. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत आताही आहे.”
“विधानसभेच्या निवडणुकात भाजपा, शिवेसना, आणि एनसीपी आम्ही एकत्र लढलो. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढलो. आम्ही एकत्र निवडणुका लढतोय,
असं आम्ही तेव्हा सांगितलं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबाबत आम्ही निकालानंतर एकत्र बसून निर्णय घेऊ, असं ठरलं होतं. सत्ता येईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू, असं बैठकीत ठरलं होतं”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
“आमच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) तसेच इतर घटक पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्रिपदावर तोडगा काढतील.
ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो होतो. या निवडणुकीत आम्हाला देदीप्यमान असं यश मिळालं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला हे यश मिळालं, ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली,
त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार यावं अशी आम्हा सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची इच्छा आहे. तशीच भावना आमच्या सर्व आमदारांच्या मनात आहे.
शिवसेनेच्या बैठकीत यावर आम्ही चर्चा केली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही काही प्रमुख मंडळींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमच्या बैठकीत झालेली चर्चा आणि शिवसेनेची भूमिका फडणवीसांना सांगितली आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून त्यांचा व पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांचा सूर बदल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भाजपाने स्पष्ट संदेश दिल्याने शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मवाळ भूमिका घेतली.
तसेच दीपक केसरकरांनी तर स्पष्ट सांगितलं की दिल्लीतले पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मात्र, महायुतीने व शिवसेनेने सर्व निर्णय दिल्लीतल्या भाजपा पक्षश्रेष्ठींकडे (पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह) यांच्यावर सोपवल्याचं केसरकरांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे.
मात्र, गृहराज्यमंत्री व शिवसेनेतील वरिष्ठ नेते शंभूराज देसाई म्हणाले, “एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची सर्वांची इच्छा आहे”.
शंभूराज देसाई म्हणाले, “आमच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) तसेच इतर घटक पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्रिपदावर तोडगा काढतील.
ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो होतो. या निवडणुकीत आम्हाला देदीप्यमान असं यश मिळालं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला हे यश मिळालं, ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली,
त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार यावं अशी आम्हा सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची इच्छा आहे. तशीच भावना आमच्या सर्व आमदारांच्या मनात आहे. शिवसेनेच्या बैठकीत यावर आम्ही चर्चा केली.
त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही काही प्रमुख मंडळींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमच्या बैठकीत झालेली चर्चा आणि शिवसेनेची भूमिका फडणवीसांना सांगितली आहे”.
शंभूराज देसाई म्हणाले, “मला इथं नमूद करायचं आहे की आमच्यात, महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कोणत्याही प्रकारची चढाओढ नाही, कुठलीही रस्सीखेच नाही.
आम्ही चर्चेतून खेळीमेळीच्या वातावरणात मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेऊ. तसेच, शिवसेनेबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत.
आम्ही ठराव करून एकनाथ शिंदेंकडे सर्व अधिकार सोपवले आहेत. त्यामुळे शिवसेनेबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर तो केवळ एकनाथ शिंदे घेतील आणि आम्हा सर्व नेत्यांना, आमदारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तो मान्य असेल”.
केसरकर काही वेळापूर्वी म्हणाले होते, “भाजपा पक्षाश्रेष्ठींच्या सूचनेनुसार सरकार स्थापन होईल. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याची असते.
मात्र तिन्ही पक्षांनी सांगितलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल
असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी व शाह घेतील तो निर्णय सर्वांनाच मान्य असेल”.