संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Beef cutlet in Sanket Bawankule's hotel bill, Sanjay Raut's serious allegation

 

 

 

 

नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

 

संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केला. आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांना श्रावण-गणपतीत गोमांस चालतं का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

 

 

नागपुरात रस्ते सुरक्षेचा नाही तर बेवडेबाजीचा नियम आहे. अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता, तर त्याचं काय झालं असतं? पोलिसांनी त्याला,

 

त्याच्या कुटुंबाला, मित्राला धरुन त्याची धिंड काढली असती. पण इथे सलमान खान सुटतो, एका बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो… तो कोणाचाही मुलगा असो,

 

नियम सर्वांना सारखे आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात लिहिली जाईल. इतका घटिया गृहमंत्री राज्याला कधी मिळाला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

 

नागपुरात फडणवीसांच्या नाकासमोर एवढा मोठा अपघात झाला, १७-१८ जण हॉस्पिटलमध्ये आहेत. ज्याच्या मालकीचं वाहन आहे, त्याचं साधं नाव एफआयआरमध्ये नाही.

 

 

प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरुन अपघातानंतर त्याला बदलण्यात आलं, त्याला तुम्ही वाचवताय? तु्म्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाता करताय? त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं बिल मिळालेलं आहे.

 

त्यांच्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं बिल समोर आणलं पाहिजे. त्यात दारुचं बिल आहे. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात.. चिकन, मटण यांच्यासोबत बीफ कटलेटचंही बिल आहे..

 

गोमांस… श्रावण आहे, गणपती आहेत… आम्हाला हिंदुत्व शिकवतात? पोलिसांनी बिल जप्त केलंय. तुम्ही बिफ खायचं आणि लोकांचे बळी घ्यायचे.. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

 

 

देवेंद्र फडणवीस, ज्याप्रमाणे तुम्ही गृह मंत्रालय चालवताय, तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना चार वर्ष जुन्या प्रकरणात अटक करायला निघाले आहात.

 

त्यांनी गृहमंत्री म्हणून काही निर्णय घेतले असतील. पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षातील एका नेत्याच्या मुलाने दहा गाड्या चिरडून,

 

दारु पिऊन, लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याला तुम्ही अभय देताय? कुठे फेडाल हे पाप? हे भयंकर आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *