सरकारकडून 26 युट्यूबर्सवर कारवाई ;पहा काय आहे कारण ?
Government action against 26 YouTubers; see what is the reason?

युट्यूबवरुन फेक न्यूज पसरवणाऱ्यांची आता काही खैर नाही. केंद्र सरकारने फेक न्यूज संदर्भात कडक पावले उचलली आहेत. सध्याच्या काळात युट्यूब हे कमाईचे मोठे साधन झाले आहे.
युट्यूब व्हिडीओची कमाई क्लिक्सवर आधारित असते. अनेक युट्यूबर्स याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या जातात. यातून खळबळ निर्माण करुन व्ह्यूज वाढवण्याचा हेतू असतो.
त्यामुळे फेक न्यूजमधून होणारी बेकायदेशीर कमाई ही गंभीर चिंतेची बाब बनत चालली आहे. भारत सरकारने याविरोधात पुन्हा एकदा मोठा स्ट्राइक सुरू केला आहे.
खोट्या बातम्यांमधून पैसे कमावणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या एका वर्षात म्हणजे डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत, पीआयबीने अशा 26 युट्यूबर्सवर कारवाई केली. नियमितपणे चुकीची माहिती आणि बातम्या प्रकाशित करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 20 अंतर्गत u 120 हून अधिक YouTube चॅनेल अवरोधित केले आहेत.