10 कोटीचा रेडा ,मंत्री वैतागले ,काय आहे प्रकरण ?
10 crore raid, Minister is upset, what is the matter?

10 कोटीचा रेडा सध्या महाराष्ट्रात चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. मात्र, याच 10 कोटीच्या रेड्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चांगलेच वैतागले आहेत.
कृषी प्रदर्शन चंद्रकांत पाटील रेड्याचा उल्लेख करत बदल करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. ‘हा’ रेड्याचा विषय नेमका काय आहे?
दर वेळेच्या प्रदर्शनात तोच तोच रेडा, तेच तेच पक्षी दिसतात.. 10 कोटीचा रेडा तर नेहमीच दिसतो. अरे हा रेडा कोणी का घेत नाही असा सवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. 10 कोटींचा रेडा कुणी घेत नसेल तर मी विकत घेतो असं मिश्किल विधान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
अनेक कृषी प्रदर्शनात हरियाणाचा तब्बल दीड टन वजनाचा मुऱ्हा जातीचा रेडा आणला जात असल्याबद्ददल चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केलीय.. आणि यात बदल करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंयय कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राउंडवर भीमा कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं, या प्रदर्शनाच्या सांगता समारंभात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते..
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भीमा कृषी पशू प्रदर्शन सुरु आहे. कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान इथं हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतो तो विधायक नावाचा रेडा. हा रेडा चक्क एसी तबेल्यात राहतो आणि एसी गाडीमध्ये फिरतो. दीड टन वजनाचा हा रेडा जगातला सर्वात उंच रेडा आहे.
दरम्यान, वर्धा येथे कृषी महोत्सव आणि पशुप्रदर्शनीत अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील उमेश दादाजी मुटकरे यांच्या मालकीचा रेडा पशुपालकांसह शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरला होता.
या रेड्याचे नाव रुस्तम आहे. त्याचे वजन 9 क्विंटल असून त्याची लांबी 12 फूट व उंची 5.5 फूट आहे. विशेष म्हणजे या रेड्याला विकत घेण्यासाठी ६ लाखांची मागणी झाली असून मुटकरे यांनी त्याची किंमत 18 लाख रुपये ठेवली. मुटकरे रुस्तम रेड्याचे संगोपन करताना त्याला दररोज 10 किलो जवसाची ढेप, पाच लिटर दुध व 12 अंडी आणि हिरवा पौष्टिक चारा असा आहार देतात.