धस -प्राजक्ता माळी प्रकरनातं आता पंकजा मुंडे यांची उडी
Pankaja Munde's jump after the Dhas-Prajakta Mali incident

आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी भाष्य करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्याने वातावऱण चांगलेच तापले आहे.
प्राजक्ता माळीने आमदार सुरेस धस यांना प्रत्युत्तर दिले होते. यावेळी प्राजक्ताने महिला सन्मानाचा मुद्दा समोर आणला.
यावरुन आता राजकीय तसेच कलाक्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या सर्व प्रकरणात राजकारण्यांकडून प्रामुख्याने मुंडे बहीण भावांना घेरले जात आहे.
त्यामुळे धसांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. प्राजक्ता माळीने प्रत्युत्तरासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मंत्री पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दुर्दैवाने soft target आहे स्त्री आणि तिचे सत्व, असे म्हणत पंकजा मुंडेंनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आणि टीकाकारांना आपल्या शैलीत सुनावले आहे.
मंत्री पंकजा मुंडेंनी एक्स हँडलवर पोस्ट लिहत म्हणाल्या की, ”शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.
त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.
‘दुर्दैवी घटना’हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत?
चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने soft target आहे
स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे?’
तर पुढे त्यांनी ‘तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी.
दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी ,
रश्मिका मांदना आणि सपना चौधरी यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली. तिने राज्य महिला आयोगाकडे धस यांची तक्रार केली.
शिवाय, आज प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला आणि निवेदन देखील दिले. दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीने भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही
आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात,
अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे.
त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल.
महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत
आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य
व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल.